Bipin Rawat education | Salary | Defence work | Bipin Rawat Awards/medals | Bipin Rawat RIP
भारताचे पहिलेच संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत अपघाती मृत्यू | लढवय्या गमावला
भारतीय सैन्यदलाचा आधुनिककार
CDS General Bipin Rawat Death : भारताचे पहिलेच संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूनं भारतच नाही तर पाकिस्तानातही हळहळ व्यक्त केली जातेय.
सरसेनाअध्यक्ष जनरल बिपीन रावत (६२ वय) व अन्य काही जणांना घेऊन जाणारे भारतीय हवाई दलाचे 'MI-१७ V-५ ' हे हेलिकॉप्टर तमिळनाडूतील कुन्नूरजवळील घनदाट जंगलात कोसळले. यात जनरल बिपीन रावत त्यांचा पत्नी मधुलिका रावत व अन्य अकरा जणांचा अपघाती मृत्यू झाला.
पाकिस्तानचे 'जॉईंट चीफ ऑफ स्टाफ कमिटी' (CJCSC) प्रमुख जनरल नदीम रझा तसंच पाकिस्तानचे लष्करप्रमुख (COAS) जनरल कमर जावेद बाजवा यांनी भारतीय संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी (spouse) मधुलिका रावत यांच्या मृत्यूवर (death) शोक व्यक्त केला आहे. पाकिस्तान सशस्त्र दलाचे प्रवक्त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून अधिकृतरित्याही माहिती देण्यात आली आहे.
जनरल बिपीन रावत यांना भारतीय सैन्यदलाचे आधुनिककार मानले जाते. त्यांचा चीन व पाकिसतानी आव्हानांना पुरून उरणारा महत्वाचा दुवा अकाली निधनाने आपण गमावला आहे.
लढवय्या जनरल बिपीन रावत : लष्करी पार्श्वभूमी
जनरल बिपीन रावत यांनी लष्करात चाळीस वर्षे सेवा केली. त्यांचा जन्म (Born) १६ मार्च १९५८ रोजी उत्तराखंडमधील (uttarakhand, paudi) पौडी येथे झाला. शालेय शिक्षण त्यांनी शिमाल्यातील क्याबरीअन हौल स्कूलमध्ये घेतले. वडील लेफ्टनंट जनरल लक्ष्मण सिंग रावत, वडिलांच्या पावलावर पाउल ठेवत, त्यांनी लष्करात प्रवेश केला. लष्कराचे प्रतिनिधी म्हणून बिपीन रावत यांनी बाहेरील देशांना भेटी दिल्या. तानंतर त्यांनी नेपाळच्या लष्कराचे सन्माननीय जनरल पद भूषविले होते. २०१५ मध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात ते वाचले होते.
२० ऑक्टोबर २०११ रोजी ते मेजर जनरल, १ जून २०१४ रोजी लेफ्टनंट जनरल आणि १ जानेवारी २०१७ रोजी जनरल म्हणून नियुक्त झाले.
कामगिरी
त्यांच्या काळात २०१६ मध्ये पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राईक (Surgical strike) चे नियोजन होऊन, भारतीय लष्कराने (Indian Army) पाकव्याप्त भाग काश्मीर येथे घुसून कारवाई केली होती. लष्करातील कामगिरीबद्दल जनरल रावत यांना 'परम विशिष्ट सेवा मेडल', उत्तम युध्द सेवा मेडल', युध्द सेवा मेडल', सेना मेडल' यांनी गौरविण्यात आले होते.