कोरोना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कोरोना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २५ मे, २०२१

what is Yellow Fungus ? : Symptoms, Causes & Precaution

 


काय आहे Yellow Fungus / पिवळी बुरशी ?



    

    कोरोनाच्या पाहिल्या लाटेवर मात करून भारताने यशस्वी कामगिरी केली. दुसऱ्या लाटेबरोबर सामना करताना नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला. काही रुग्णांनी कोरोनावर मात केली; तर अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. अशा कठीण परिस्थितीला तोंड देत असताना पुन्हा नवे रोग प्रकट होताना दिसले. जसे कि Mucormycosis अर्थात Fungus (Black & White) काळी आणि पांढरी बुरशी. आता पिवळी बुरशी हा प्रकार समोर आला आहे. पाहूयात नक्की काय आहे हा प्रकार....?  


Yellow Fungus (पिवळी बुरशी) :

    आता नागरिकांची परिस्थिती आगीतून फोफाटयात अशी झाली आहे. कोरोना विषाणूची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या हळू-हळू कमी होत असताना; राज्यात काळ्या आणि पांढरया बुरशीचे पाच हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले. याचबरोबर रुग्णांना आता पिवळ्या बुरशीचीदेखील लागण होताना दिसत आहे. काळ्या आणि पांढऱ्या बुरशीप्रमाणेच पिवळी बुरशीदेखील Mucormycetes याच समूहातील एक रोग आहे.


Yellow Fungus ची लक्षणे :

      ·     भुक कमी लागणे.

      ·      वजन कमी होणे.

      ·       डोळ्यांना सूज येणे.

      ·       आळस येणे.

      ·       डोळ्यांना पाणी येणे.

      ·        अवयव निकामी होणे.

      ·        डोळे खोल जाणे.

      ·        कुपोषण.

 

पिवळी बुरशी होण्यामागच कारण काय ?

        ·   घरातील दमट/आर्द्रता वातावरण.

        ·   शिळे अन्न खाणे.

        ·   घरातील आणि परिसरातील अस्वच्छता.

        ·   कुजलेला ओला कचरा.


यावर उपचार काय ?

    या बुरशीवर कुठलीही लस नाही किंवा याविषयी जर्नल मध्ये कुठलीही अधिक माहिती नाही; परंतु तज्ञांचा मते Amphotericin - B या Injection ने हि बुरशी हळू-हळू कमी होण्यास मदत होऊ शकते.


पिवळी बुरशी होऊ नये म्हणून काळजी कशी घ्यावी ?

         

            ·   आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा.

      ·   ताजे अन्न खावे. शिळे अन्न खाऊ नये.

      ·   घरामध्ये दमट वातावरण असायला नको.

      ·   वेळोवेळी भरपूर पाणी प्यावे.

 ·   रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी. 

   (रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये व फळे यांचा समावेश करावा)

       कोरोना, काळी बुरशी आणि पांढऱ्या बुरशीचे संकट देशावर घोंघावत असताना हा पिवळ्या बुरशीचा प्रकार उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये समोर आला. येथील रुग्णांना या Yellow Fungas म्हणजेच पिवळ्या बुरशीची लागण होताना आढळून आलं आहे. या बुरशीला इतरांपेक्षा घातक मानले जात आहे; कारण हि थेट शरीराच्या अंतर्गत अवयवांवर आघात करते. त्यामुळे काळ्या आणि पांढऱ्या बुरशीच्या तुलनेत पिवळ्या बुरशीचा धोका अधिक असून ती प्राणघातक आहे असे म्हटले जात आहे. यापूर्वी हा आजार सरपटणारया प्राण्यांमध्ये दिसून येत असे; परंतु मानवामध्ये हा आजार पहिल्यांदाच दिसून आला. 

  कोरोना positive आलेल्या रुग्णाने तात्काळ आपले उपचार सुरु करावे; जेणेकरून आजारात अधिक भर पडणार नाही. घरामधील वातावरण दमट होऊ देऊ नये; कारण दमट वतावरणात बुरशीच्या वाढीमध्ये भर पडते. आसपासचा परिसर गलिच्छ न ठेवता तो स्वच्छ हवा. या रोगाची लक्षणे जरी सामान्य असली; तरी हा रोग मात्र सामान्य नाही.

 

  आता यापुढे कोणते नवीन संकट जन्म घेईल आणि आपण त्यासमोर कसे उभे ठाकू हे पाहण्याजोगे. त्याचा आढावा आपण पुढील लेखात घेत राहू....

 

 

                                                          (क्रमशः)

 


      

रविवार, २३ मे, २०२१

Mucormycosis and Covid-19

  

Mucormycosis आणि कोरोनाची ३री लाट.....


काय आहे ‘Mucormycosis’ किंवा ‘काळी बुरशी’......?   

आजमितीला जगभरात कोरोनाने थैमान घातलेलं आपल्याला दिसून येत आहे. कोरोनाचं प्रमाण वाढत असताना, रुग्णांना आणखी एका रोगाची लागण होताना दिसतेय. तो रोग म्हणजे ‘’Mucormycosis’’. यालाच ‘काळी बुरशी’ असे म्हणतात. गेल्या महिनाभरापासून आपण या काळ्या बुरशीबद्दल ऐकतो आहोत. तर काय आहे ‘Mucormycosis’ हे आपण सविस्तर माहिती पाहू. 




what is Mucormycosis ? काळी बुरशी म्हणजे नेमकं काय ?

काळ्या बुरशीलाच Zygomycosis किंवा Mucormycosis म्हणतात. हा एक प्रकारचा बुरशीजन्य रोग आहे. बुरशीचा समावेश असलेल्या Murcormycetes नावाच्या समूहातील हा रोग, ज्याला Black Fungas देखील म्हणतात.




Symptoms of Mucormycosis  / काळ्या बुरशीची लक्षणे : 

·           नाकाच्या आत काळे ठिपके दिसणे

·          घशामध्ये काळे ठिपके

हि बुरशी तीन ठिकाणी येते  

   1) नाकापासून मेंदूपर्यंतलक्षणे – चेहरा सुजणे, नाक बंद होणे,डोकेदुखी, ताप.

              2)  फुफुसांमध्ये लक्षणे – ताप, खोकला, छातीत दुखणे.

               3)  आतड्यामधील लक्षणे – पोटदुखी, उलटी.

                                 

Mucormycosis ची लागण कशी / कोणाला होते ?

बुरशी हि जमिनीवर, हवेमध्ये, उकिरड्यावर, कुजलेले पदार्थ असलेल्या ठिकाणी तसेच जनावरांच्या शेणामध्ये असते. हवेपेक्षा जमिनीवर जास्त प्रमाणात असते.

    ज्या व्यक्तींना मधुमेह (अनियंत्रित), कॅन्सर, HIV, शस्त्रक्रियेमुळे जखम झालेली आहे किंवा अवयव प्रत्यारोपण (Organ Transplant) केलेले आहे अशा व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती अतिशय कमी असते, त्यामुळे अशा व्यक्तींना या बुरशीची जलद लागण होते.

   अनियंत्रित मधुमेह असणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात kitons तयार होत असतात. ते kitons व बुरशीचा enzyme (द्रव्य) एकत्र येऊन हि बुरशी तयार होते आणि त्यानंतर हि बुरशी पूर्ण शरीरात पसरू लागते.




बुरशीपासून काळजी कशी घ्याल ?

या रोगासाठी कुठलीच लस उपलब्ध नाही. आता प्रश्न असा की हा रोग सांसर्गिक आहे का ? तर मुळीच नाही; परंतु काळजी अशी घ्यावी-

·          Dexamethasone, Prednisone, Medrol, Hydrocortisone सारख्या स्टेरॉइडचा वापर कमी करावा; कारण स्टेरॉइडमुळे कृत्रिमरीत्या रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

  (स्टेरॉइड हा मधुमेहासारखे आजार असणाऱ्या रुग्णांना दिला जाणारा डोस होय.) 

·             अश्या व्यक्तीने आपणास असलेला आजार नियंत्रित करावा.

·  डॉक्टरांचा सल्ला घ्यावा; कारण ‘अम्फोटेरीसीन बी’ अर्थात बुरशी विरोधी औषधाचा सहाय्याने शस्त्रक्रिया करून बुरशीजन्य भाग काढून टाकता येतो.





Mucormycosis ची सद्यपरिस्थिती :

महाराष्ट्र राज्यात गेल्या महिन्याभरात Mucormycosis चे जवळजवळ २००० रुग्ण आढळून आले असून ५०० जणांनी यावर मात केली व ९० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

       राज्यात पुणे Mucormycosis चे हॉटस्पॉट झाले आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत या बुरशीचे ३५० रुग्ण आढळले असून, २० जणांचा बळी गेला आहे. त्याचप्रमाणे जवळजवळ २०० जणांनी यावर मात केली.

   डोळे / दृष्टी जातात, शरीर बुरशीजन्य होते, मेंदूपर्यंत हि बुरशी पोहोचू शकते; मग Mucormycosis ला घाबरायचे का ? तर मुळीच नाही. तज्ञांच्या माहितीप्रमाणे हा आजार विशिष्ट रोग असणाऱ्या व्यक्तींचा होतो. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. कॅन्सर, मधुमेह इत्यादी सारखे रोग असणाऱ्या व्यक्तींनी स्टेरॉइडचे डोस समतुल्य पद्धतीने घेतले पाहिजेत जसे कि –

·           Dexamethasone – ६  मिली. ग्राम

·            Prednisone – ४० मिली. ग्राम

·        Medrol – ३२ मिली. ग्राम

·            Hydrocortisone – १४० मिली. ग्राम

अशा प्रकारे व्यक्तीने आपला आजार नियंत्रित ठेवावा.लोकसंखेच्या मानाने हा आजार खूप कमी प्रमाणात आहे त्यामुळे घाबरून जाऊ नये.

    याचदरम्यान कॉरोनाची तिसरी लाट येण्याची चिन्हे दिसत आहेत. कोरोना ने अगदी विक्राळ रूप धारण केलेलं दिसतंय. या संसर्गामध्ये सतत म्युटेट (बदल) होतोय. त्यामुळे या संसर्गाच्या ४ ते ५ लाटा येण्याची शक्यता आहे. हा म्युटेट महाराष्ट्रामध्ये दुहेरी तर बंगालमध्ये तिहेरी आढळून आला.


कोरोनाची तिसरी लाट कधी येणार ?

दुसऱ्या लाटेमुळे आज देशभरात कोरोनाने हाहाकार माजलेला दिसतोय. हि लाट ओसरण्यापुर्वीच तिसरी लाट सप्टेंबर महिन्यात येणार असल्याची शक्यता साथरोग तज्ञांनी दर्शवली आहे. दुसऱ्या लाटेचा कहर महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश अशा राज्यांमध्ये पहावयास मिळाला. आता तिसरी लाट येऊन धडकणार म्हंटल्यावर प्रश्न पडतो कि हि तिसरी लाट किती गंभीर असणार ?

 





तिसरी लाट गंभीर असणार कि नाही ?

तिसरी लाट घातक असणार; परंतु तीव्रता मात्र कमी असेल. दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती गंभीर झालेली आपण पाहिली. तर तिसरी लाट हि तेवढीच परिणामकारक असेल का? याचा अंदाज लावता येत नाही. परंतु तिसऱ्या लाटेमध्ये मृत्युदर कमी असावा किंवा मृत्यू होऊच नये यासाठी प्रयत्न करावे लागतील.


लॉकडाउनचा फायदा किती ?

  लॉकडाउन करूनही रुग्ण संख्येत घट होत नाही. थोड्या प्रमाणात फरक जाणवतो; परंतु परिस्थिती सुधारलेली नाही. मुंबईमध्ये रुग्ण संख्या कमी होत असताना परत ५००० रुग्ण आढळून आले. 




   नागरिक नियमांचं व्यवस्थितरीत्या पालन करताना दिसत नाहीत. सुरक्षित अंतर पाळणे, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर, वेळोवेळी हात स्वच्छ साबणाने-पाण्याने साफ करणे इत्यादी गोष्टींची योग्यरित्या अंमलबजावणी होत नाही. मास्कचा वापर कसा करावा याबाबत माहिती नसल्यामुळे नागरिकांचे मास्क कधी गळ्यात तर कधी दाढीवर असते. 

निरीक्षणानुसार –

·         ६४ % लोकांचे मास्क नाकाच्या खाली असते.

·        २० % लोकांचे मास्क दाढीवर असते.

·        ०२ % लोकांचे मास्क गळ्यात (गळ्यातील आभूषण) असते.

·     १४ % च लोक योग्य पद्धतीने तोंड, नाक,दाढी झाकून मास्क घालातात.

   अशा प्रकारामुळे रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यास अडथळा निर्माण होतो. असा निष्काळजीपणा होत असेल तर आपण तिसरी लाट येण्यापूर्वी आणखी निर्बंध कडक केले पाहिजेत.

 

३री लाट येण्यापूर्वीची तयारी कशी हवी ?

दुसऱ्या लाटेने गाठलेला उच्चांक बघता तिसऱ्या लाटेपुर्वी आवश्यक गोष्टी व वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा केला गेला पाहिजे. आवश्यक गोष्टी व वैद्यकीय उपकरणे -  

·         प्राणवायु सिलेंडर (Oxygen Cylinder)

·            श्वासोछावास साधन (Ventilator)

·            खाट (Bed)

·            कोरोना चाचणी केंद्र (Corona testing Centre)

·           पुरेसा लसींचा पुरवठा (Enough Supply of Vaccines)

   




   सर्वात जास्त भर या गोष्टीवर दिला गेला पाहिजे कि मृत्यू होणार नाहीत आणि व्यक्तीचा हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर वैद्यकीय उपकरणा-अभावी मृत्यू होणार नाही. त्याचप्रमाणे सौम्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी घरगुती उपचार घेतले पाहिजेत.

   अशाप्रकारे जर आपण जबाबदारीने व काळजीने काही गोष्टीवर निर्बंध अनिवार्य करून व्यवस्थितरीत्या सूचनांचे पालन केले व वेळोवेळी भानावर राहून काळजी घेतली तर येणारी तिसरी लाट स्वत:हून पळ काढेल.

   दुर्दैवाने तिसऱ्या लाटेला आपल्याला तोंड द्यावे लागले; तर तेव्हाचे चित्र सद्यस्थितीपेक्षा कसे वेगळे असेल हे आपण पुढील लेखात पाहू.....

                                                      

                                                     (क्रमशः)   

मंगळवार, १८ मे, २०२१

गुणगान गाऊ कोरोना चे....


कोरोना महामारी  च्या विळख्यातून सुटलो म्हणून सर्वजण पहिल्या लाटेनंतर कारागृहातून सुटलेल्या कैद्याने सोडवा तसा थोडा मोकळा श्वास सोडत होते. पहिल्या लाटेमध्ये सर्वांनी या महामारीशी दोन हात करून रुग्ण संख्येचा आलेख खाली आणला. आता परिस्थिती पूर्ववत होणार म्हणताच दुसरी लाट  येऊन ठेपली. आता या वेटोळ्यातून  सुटावे कसे ? हा गंभीर प्रश्न  समोर ठाकला आहे. 



पहिली लाट कशी ?  

                कोरोनाच्या पहिल्या लाटे दरम्यान शासनाद्वारे देण्यात आलेल्या सूचनांचे पालन  झाले. तशी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत गेली. नागरिकांचे हाल हि तेवढेच झाले. ऑक्सिजन सिलेंडर, रुग्णासाठीचे बेड, रुग्णवाहिका अशा आवश्यक गोष्टींच्या उपलब्धतेमुळे  आणि रुग्णांची प्ररोगप्रतिकारक शक्ती, प्रबळ इच्छा शक्ती च्या जोरावर अनेक जणांनी यशस्विरीत्या कोरोनावर मात केली.

          पहिल्या लाटेनंतर कोरोनापासून वाचल्याचं समाधान पचवण्याआधीच दुसऱ्या लाटेने तोंड वर काढले. या काळादरम्यान अनेक घटनांचे दर्शन घडले. रुग्ण संख्या वाढण्याबरोबरच मृत्यू दर हि वाढतच गेले. एका महिन्यामध्ये लाखो मृत्यू  नोंदवले गेले. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये अधिक मृत्यू झालेले असल्याने मृत्यू दराचा आलेख उंचावत गेला. 



        कोरोनाच्या गंभीर अवस्थेत जाऊन मृत्यू होण्यापेक्षा; वैद्यकीय उपकरणांच्या अभावामुळे जास्त मृत्यू झालेले आढळले. दुर्दैवाने दिसून आली ती ऑक्सिजन सिलेंडरचे असंतुलित वाटप, वैद्यांचे  रुग्णाकडे दुर्लक्ष, कोरोना रुग्णांसाठी विशेष रुग्णालये व विलगीकरण कक्षांची कमतरता इत्यादी गैरव्यवस्थेची लक्षणे. 



       कोरोना काळात दोन हात करतांनाच बर्ड फ्लू  हा कोंबडी पासून पसरणारा आजार डोक्यावर येऊन ठेपला. कोरोनाच्या सुरुवातीपासूनच अर्थव्यवस्थेला धक्का बसला होता; त्याप्रमाणे बर्ड फ्लूचा देखील अर्थव्यवस्थेवर परिणाम  झालेला दिसून आला. 



कोरोना व जेष्ठ नागरिक : 

                                 जेष्ठ-वयस्कर नागरिक देखील कोरोनातून उपचाराने बरे झाले. मधुमेह, हृदयाचा आजार  असलेल्या रुग्णांना तर जास्त धोका असताना हि हे रुग्ण देखील कोरोनातून मुक्त झाले. कोरोना आजारातून ठीक होणाऱ्यांची संख्या ८० % आहे. 

                 याच दरम्यान बाय वन गेट वन फ्री  अवस्था झालेली दिसून आली. ती अशी कि कोरोना बरोबर म्युकरमायकोसीस  फ्री; परंतु यातील एक सकरात्मक भाग असा कि हे सगळ्यांनाच लागू झालं नाही. ज्या रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती अतिशय कमी आहे अशा रुग्णांमध्ये हा आजार दिसून आला. हा बुरशीजन्य आजार  आहे. या आजारावर अंटी फंगल  (Anti-fungal) औषधे वापरून किंवा शरीराच्या बुरशीजन्य भागाची सर्जरी करून उपचार करता येतो हा दुसरा सकारात्मक भाग.











दुष्काळात तेरावा महिना : 

              एका बाजूला हॉस्पिटल ला आग किंवा प्राणवायु सिलेंडर फुटून मृत्यू होणे यासारख्या घटना घडत असताना दुसऱ्या बाजूला या कठीण काळात एकमेकांना सहकार्य करण्याऐवजी लसीकरण, रुग्णवाहिका, दवाखाने, RTPCR किंवा HRCT सारख्या चाचण्या आणि औषधांचे दर वाढवून सामान्य नागरिकांना लुटण्यासारखा लज्जास्पद प्रकार घडताना दिसून आला. कोरोना मुळे होणाऱ्या मृत्यू दराचा आलेख उंचावत असताना याला आटोक्यात कसं आणता येईल? याचा विचार न करता लुट करणे कितपत योग्य आहे ?




 इ.स. पूर्व ५००० : 

                वेद-पुराणांमध्ये आपण आपली परिपूर्ण स्वच्छता राखण्याबद्दल उल्लेखित आहे.  ते असे –

 


अनाहर:स्वानि खानि न स्पृशेदानिनित्य: मान्स्मृति  (विनाकारण अंगाला इथे तिथे हात लाऊ नये). 

तसेच  हस्त्पादे मुखे चैव पश्चाद्रे भाजन स्वेतपद्म्सृष्टी नाप्रक्षाचीत्पानिपादो भूज्जीत सुसृतासंहिता चिकित्सा  (खाण्यापूर्वी हात, पाय, तोंड धुवावे). 

आपण हे सर्व ऐकलेलं, वाचलेलं असताना हि दुर्लक्ष करत आलो आणि करत आहोत.


     एका बाजूस कुठे मासे पकडण्यासाठी झुंबड  तर कुठे लसीकरणासाठी गर्दी, कुठे बाजारात विनामास्क फिरणारी मंडळी तर कुठे दुकानावरील गर्दी, कुठे दुकान बंद असतानाही मागून खरेदी विक्री सुरु असल्याच निदर्शनास आलं हि नागरिकांची बेजबाबदारपणाची लक्षणे. तर दुसऱ्या बाजूस कुठे लसीकरणाचा अभाव तर कुठे लसींचा तुटवडा, कुठे दुसरा डोस यशस्वी  तर कुठे त्याचा अभाव हि शासनाची बेजबाबदारपणाची लक्षणे. या गोष्टीमध्ये राजकारणाचा वास दिसून आला आणि याच दरम्यान शासकीय बोलके बाहुले  ही अदृश्य झाले.




         
       



          या सर्व बाबींमध्ये त्रास ग्रस्त होतात ते नागरिक,  मग प्रश्न येतो कि यास पूर्णविराम कधी? Covishield, Remdesivir किंवा 2 Deoxy-D-Glucose अशी कुठलीही लस तयार केली तरी ती निरुपयोगीच  ठरणार. कारण, कोरोना नावाचं वृक्ष  तर लागलं आहे आणि त्याची मुळे कुठपर्यंत रुजली असावीत हे तर अदृश्यच असून ती कुठवर पसरतील हे न सांगता येण्याजोगे; परंतु भविष्यात कोरोना आणि म्युकरमायकोसीस सारख्या आजार आणि संकटांची उत्पत्ती  होत राहण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही.



 


         यानंतर तिसरी लाट कशी ? ....आणि  पुढील परिस्थिती कशी राहील ?.... हे तर न सांगण्याजोगे परंतु आपण याचा आढावा पुढील लेखात घेत राहू....     
                   
                                                                                                                                                   
                                                                                                                                                  (क्रमश:)        
वैयक्तिक मत / विचार..... 


CDS General Bipin Rawat Death (तमिळनाडू)| भारताचे पहिलेच संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत अपघाती मृत्यू | Bipin Rawat Awards/medals | Bipin Rawat education

Bipin Rawat education | Salary | Defence work |  Bipin Rawat Awards/m edals |  Bipin Rawat RIP भारताचे पहिलेच संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन र...