काय आहे Yellow Fungus / पिवळी बुरशी ?
कोरोनाच्या पाहिल्या लाटेवर मात करून भारताने यशस्वी कामगिरी केली. दुसऱ्या लाटेबरोबर सामना करताना नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला. काही रुग्णांनी कोरोनावर मात केली; तर अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. अशा कठीण परिस्थितीला तोंड देत असताना पुन्हा नवे रोग प्रकट होताना दिसले. जसे कि Mucormycosis अर्थात Fungus (Black & White) काळी आणि पांढरी बुरशी. आता पिवळी बुरशी हा प्रकार समोर आला आहे. पाहूयात नक्की काय आहे हा प्रकार....?
Yellow Fungus (पिवळी बुरशी) :
आता नागरिकांची परिस्थिती आगीतून फोफाटयात अशी झाली आहे. कोरोना विषाणूची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या हळू-हळू कमी होत असताना; राज्यात काळ्या आणि पांढरया बुरशीचे पाच हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले. याचबरोबर रुग्णांना आता पिवळ्या बुरशीचीदेखील लागण होताना दिसत आहे. काळ्या आणि पांढऱ्या बुरशीप्रमाणेच पिवळी बुरशीदेखील Mucormycetes याच समूहातील एक रोग आहे.
Yellow Fungus ची लक्षणे :
· भुक कमी लागणे.
· वजन कमी होणे.
· डोळ्यांना सूज येणे.
· आळस येणे.
· डोळ्यांना पाणी येणे.
· अवयव निकामी होणे.
· डोळे खोल जाणे.
· कुपोषण.
पिवळी बुरशी
होण्यामागच कारण काय ?
· घरातील दमट/आर्द्रता वातावरण.
· शिळे अन्न खाणे.
· घरातील आणि परिसरातील अस्वच्छता.
· कुजलेला
ओला कचरा.
यावर उपचार काय ?
या बुरशीवर कुठलीही लस नाही किंवा याविषयी जर्नल मध्ये कुठलीही अधिक माहिती नाही; परंतु तज्ञांचा मते Amphotericin - B या Injection ने हि बुरशी हळू-हळू कमी होण्यास मदत होऊ शकते.
पिवळी बुरशी होऊ नये म्हणून काळजी कशी घ्यावी ?
· आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा.
· ताजे अन्न खावे. शिळे अन्न खाऊ नये.
· घरामध्ये दमट वातावरण असायला नको.
· वेळोवेळी भरपूर पाणी प्यावे.
· रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी.
(रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये व फळे यांचा समावेश करावा)
कोरोना, काळी बुरशी आणि पांढऱ्या बुरशीचे संकट देशावर घोंघावत असताना हा पिवळ्या बुरशीचा प्रकार उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये समोर आला. येथील रुग्णांना या Yellow Fungas म्हणजेच पिवळ्या बुरशीची लागण होताना आढळून आलं आहे. या बुरशीला इतरांपेक्षा घातक मानले जात आहे; कारण हि थेट शरीराच्या अंतर्गत अवयवांवर आघात करते. त्यामुळे काळ्या आणि पांढऱ्या बुरशीच्या तुलनेत पिवळ्या बुरशीचा धोका अधिक असून ती प्राणघातक आहे असे म्हटले जात आहे. यापूर्वी हा आजार सरपटणारया प्राण्यांमध्ये दिसून येत असे; परंतु मानवामध्ये हा आजार पहिल्यांदाच दिसून आला.
कोरोना positive आलेल्या रुग्णाने तात्काळ आपले उपचार सुरु करावे; जेणेकरून आजारात अधिक भर पडणार नाही. घरामधील वातावरण दमट होऊ देऊ नये; कारण दमट वतावरणात बुरशीच्या वाढीमध्ये भर पडते. आसपासचा परिसर गलिच्छ न ठेवता तो स्वच्छ हवा. या रोगाची लक्षणे जरी सामान्य असली; तरी हा रोग मात्र सामान्य नाही.
आता यापुढे कोणते नवीन संकट जन्म घेईल आणि आपण त्यासमोर कसे उभे ठाकू हे पाहण्याजोगे. त्याचा आढावा आपण पुढील लेखात घेत राहू....
(क्रमशः)
Very helpful information...
उत्तर द्याहटवाYes, Thank You
हटवा