आज देशभरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान मुलांमध्ये जास्त प्रमाणात लक्षणे आढळून आली नाही; मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव बघता, तज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान लहान मुलांना जास्त धोका असण्याची शक्यता दर्शवली होती. त्याप्रमाणे लहान मुलांमध्ये आता कोरोनाबरोबरच MIS-C या विषाणूचे संक्रमण होत आहे. यामुळे लहान मुलांच्या बाबतीत पालकांची चिंता वाढली आहे.
काय आहे हा MIS-C नावाचं विषाणू संक्रमण ? काय आहेत याची लक्षणे ? आणि उपचार काय ?
What is MIS-C
? MIS-C काय आहे ?
MIS-C (“मिस-सी”/’एमआयएस-सी’) चे पूर्ण रूप Multisystem Inflammtory Syndrome in Children होय. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूचा शरीरात शिरकाव झाल्यानंतर चार आठवड्यांनी दोन ते पंधरा वर्ष वयोगटातील लहान मुलांमध्ये हे ‘एमआयएस-सी’चं संक्रमण होताना दिसून येत आहे. याची नेमकी लक्षणे कोणती ?
Symptoms of MIS-C / ‘मिस-सी’ची लक्षणे :
‘मिस-सी’ची लक्षणे हि सर्वांमध्ये सारखीच दिसून येत नाहीत, ती सर्वांमध्ये वेगवेगळी दिसून येतात. ती अशी असू शकतात – ताप, अशक्तपणा, उलटी, तळपाय सुजणे, ओटी पोटात दुखणे, लाल पुरळ इत्यादी. तर या विषाणूची कारणे काय ?
Causes of MIS-C / ‘मिस-सी’ची कारणे काय ?
कोरोना नंतर या विषाणूचं संक्रमण होण्यामागचं कारण नक्की समोर आलेलं नाही; परंतु एक्स्पर्टस (Experts) च्या अध्यायनानुसार, Immune च्या Over Reaction मुळे म्हणजेच शरीराच्या रोगप्रतिकारक प्रतिसादामुळे या विषाणूची लागण होऊ शकते.
Treatment :
उपचारासाठी आपण साधारण सहाय्यक काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर क्षतिग्रस्त अवयवांची जळजळ कमी करण्यासाठी आवश्यक ती औषधे वापरण्यात यावीत. तसेच बालरोगतज्ञांच्या अतिदक्षता विभागात उपचार घ्यावेत.
How to take Precautions? / काळजी
कशी घ्यावी ?
· हात
स्वच्छ ठेवावे.
· आजारी
व्यक्तीपासून सुरक्षित अंतर पाळा.
· विनाकारण नाक, तोंड, डोळ्यांना स्पर्श करणे टाळा.
· पाणी उपलब्ध
नसल्यास sanitizer चा वापर करावा.
· सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा.
ब्रिटनमधील तज्ञांच्या अध्यायनानुसार ’एमआयएस-सी’चे अधिकाधिक लक्षणे सहा महिन्यानंतर दिसत नाहीत. लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ’एमआयएस-सी’ (MIS-C) सारख्या Complication अर्थात या विषाणूमध्ये अधिक भर पडण्यापासून काळजी घेतली पाहिजे.
हा आजार दुर्मिळ असला तरीही धोकादायक आहे. कारण तो थेट शरीरात आक्रमक रूप घेतो आणि हृदय, किडनी यांसारख्या अंतर्गत अवयवांना फेल म्हणजेच निकामी करतो.
आपणाला या संक्रमनास रोखण्यासाठी अधिकाधिक अध्ययन करावयाची गरज. तूर्तास तरी आपण काळजी घेतली पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubts, Please let me know