कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणातून इन्फेक्शन होऊन नवीन आजारांची उत्पत्ती होत असताना यावर अनेक औषधांचा, लसींचा (Remdesivir, Covaccine, Covishield) चा वापर करून बघितला; परंतु कोरोना नावाचं संकट काही गेलं नाही. पहिल्या टप्प्यात जास्त प्रमाणात परिणाम होताना दिसून आला नाही. दुसऱ्या टप्प्यात मात्र परिस्थिती अतिशय गंभीर होताना दिसून आली, कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी लक्षणे पाहण्यास मिळाली. त्याचबरोबर कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या कमी झाली. दुसऱ्या टप्प्यात सुरुवातीला जास्त गंभीर परिस्थिती नव्हती; परंतु दुसऱ्या टप्प्याच्या मध्यात आल्यानंतर स्थिती मात्र गंभीर होत गेली.लहान मुलांसाठी तज्ञांनी वर्तवलेला धोका आता सद्यस्थितीत पहावयास मिळत आहे. तो असा कि, कोरोनाबरोबर MIS-C (एम आय एस-सी ) या आजाराने आता लहान मुलांना स्वतःच्या आळ्यात अडकवल्याच दृश्य समोर येत आहे.
चिंता कमी होणार ?
मुलांसाठीच्या वाढणाऱ्या धोक्याबरोबरच जशी पालकांची चिंता वाढत आहे तशी आता हि चिंता काहीशी कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली येथील DRDO च्या प्रयोगशाळेमध्ये (Laboratory) 2DG Drug नावाचं कोरोनावरचं औषध विकसित करण्यात आलं आहे. काय आहे 2DG Drug ?
2DG Drug म्हणजे(What is 2DG Drug ?) :
या औषधावर DRDO (Defence Research & Development Organization) आणि डॉ. रेड्डीज Laboratory मध्ये एप्रिल महिन्यामध्ये काम सुरु केल गेलं. 2DG म्हणजे Deoxy-D-Glucose होय. हे औषध Cancer च्या उपचारासाठी वापरलं जात; आता हे कोरोनावर हि मात करू शकते असे सांगण्यात येत आहे. DRDOच्या Institute of Nuclear Medicine & Allied Sciences Lab मध्ये तयार केलेलं हे औषध नक्की काम कसं करत ?
2DG कसे कार्य करते? (How 2DG works on Covid )
:
Deoxy-D-Glucose म्हणजेच 2DG हे औषध थेट
विषाणू (Virus) असलेल्या कोशिकांमध्ये (Cell) जमा होऊन
विषाणूच्या उर्जेला नष्ट करते. तसेच औषधातील रेणू कोरोनाच्या SAARC Covid-2 या विषाणूला आळा घालतो. हे
औषध glucose प्रमाणे दिसते; परंतु glucose नाही.
2DG चे फायदे (Benefits of 2DG) :
डीआरडीओच्या या औषधाचे
फायदे पुढीलप्रमाणे दिसून येतात –
· रुग्णाची प्राणवायु (oxygen) वरील निर्भरता कमी होते.
· अंदाज पेक्षा रुग्ण तीन दिवस
अगोदरच बरा होतो.
· या औषधाचा कुठलाही प्रसारण
प्रभाव (side effect) नाही.
· रुग्णातील लक्षणे जलद कमी
होतात.
औषधाची
किंमत किती ? (Price of 2DG) :
तज्ञांनी दिलेल्या
माहितीनुसार किंमतीबाबत काही निश्चित नसून याची किंमत डॉ. रेड्डीज कंपनी
ठरवणार आहे; परंतु हे औषध इतरांचा तुलनेत व्यक्तीला परवडणारे असेल. 2 डी जी औषध
पाकीटाच्या (pouch) स्वरुपात आहे आणि हे पाकीट ५०० ते ६०० रुपयात उपलब्ध होईल.
2dg
चे डोस कसे घ्यावेत ?
इतर Anti-dose प्रमाणे या औषधाचं इंजेक्शन नाही. पाकिटाच्या स्वरुपात
असल्याने त्यात भुकटी (powder) असून, ती पाण्यात मिसळून प्यायची आहे. 2 डी जी चे असे डोस
सात दिवस घ्यावे लागतील. महत्वाचं म्हणजे हा डोस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच
घ्यावा.
2 डी जी च्या बाबतीत एक विशेष (कदाचित गमतीदार) गोष्ट म्हणजे आपण कोरोनाला गंडवू (मजेत काढणे) शकतो. ते असं – “जेंव्हा विषाणू शरीरात प्रवेश करतो, तेव्हा त्याला जिवंत राहण्यासाठी उर्जा आणि पोषणाची गरज असते आणि हि गरज glucose च्या माध्यमातून भागवली जाते. तर 2 डी जी हे थेट कोशिकांमध्ये जाते व अगदी Glucose (शर्करा) सारखे दिसते. त्यामुळे कोरोना विषाणू जेव्हा शरीरात प्रवेश करेल आणि कोशिकांमधील हे glucose सारखं दिसणाऱ्या औषधाशी त्याचा संबंध येईल; तेव्हा तो आपोआपच नाहीसा होण्यास मदत होईल.”
2 डी जी साठी लागणारा कच्चा माल भारतात पुरेश्या प्रमाणात उपलब्ध असल्याने त्याचे उत्पादनही भारतामध्येच होईल. 2 डी जी ‘हे औषध कोरोनाविरोधातील लढाईत निर्णायक ठरेल, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. बरोबरच या औषधाच्या पाकिटांचे वितरण देखील लवकरच होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.’
डीआरडीओने विकसित केलेल्या
या औषधाची हि पुनर्निर्मिती होय. हे औषध नवीन नव्हे. हे औषध कॅन्सरच्या उपचारासाठी
वापरण्यात आलेले आहे. 2 डी जी या औषधाची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी जानेवारी महिन्यात सुरु झाली होती.
या औषधाच्या चाचणीनंतर रुग्ण
संख्या कमी होणार का ? हे औषध कोरोनाचा कायापालट करू शकेल का ? कोरोनाचा
गेम ओवर होणार का ? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल. तसेच 2 डीजी च्या
वापरानंतरची देशातील जी नवीन पहाट असेल ती नक्कीच पाहण्यायोग्य.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubts, Please let me know