पूर्वी पासूनच आपल्याला स्वत:ची काळजी घेण्यासाठी काही सुचना दिल्याचे पुराणिक / धार्मिक साहित्यात आढळते. खालील ओळी आपल्या अशीच शिकवण देतात-
Clear instructions taught by puranas and vedas in 5000 BC to prevent Pandemic by maintaining perfect hygiene.
- लवणं व्यञ्जनं चैव घृतंतैलं तथैव च । लेह्यं पेयं च विविधं हस्तदत्तं न भक्षयेत् ।।धर्मसिन्धू ३पू. आह्नि (Salt, ghee, oil, rice and other food items should not be served with bare hand. Use spoons to serve.)
- अनातुरः स्वानि खानि न स्पृशेदनिमित्ततः ।। मनुस्मृति ४/१४४(Without a reason don't touch your own indriyas (organs like eyes, nose, ears, etc.)
- हस्तपादे मुखे चैव पञ्चाद्रे भोजनं चरेत् ।। पद्म०सृष्टि.५१/८८ नाप्रक्षालितपाणिपादो भुञ्जीत ।। सुश्रुतसंहिता चिकित्सा २४/९८(Wash your hands, feet, mouth before you eat.)
वरील सूचना सनातन धर्मात इ.स. पाच हजार वर्षापूर्वीचं दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे आपण माहिती असून हि दुर्लक्ष करतो तर काही वेळा माहितीचा अभाव असतो म्हणून आपण काळजी घेत नाही. थोडक्यात Precaution is Better Than Cure, हेच आपल्याला खूप वर्षापूर्वीच सांगितलेलं आहे परंतु आपण आधुनिकते च्या नावाखाली आणि वेळेच्या अभावाचे कारण समोर करून सर्व काही विसरून जात आहोत. त्याच बरोबर मानवी प्रगति पायी निसर्गाचा अतोनात र्हास करत आहोत. त्याचीच किंमत म्हणजे अखंड मानव जातीवर ओढवलेलं "कोरोना" नावाचं संकट. कोरोनाच आगमन झाल्यापासून आपल्या सर्वांच्याच सुख - दुख:च्या सर्वच कार्यकर्मावर गदा आली आहे. आपण कुठलेही सण-उत्सव, कार्यकर्म, सोहळे पूर्वीप्रमाणे साजरे करू शकलो नाहीत.
आपण आज पाहू शकतो कि, कोरोनाच्या कठीण काळात सण-उत्सव साजरे करण्यावर अनेक निर्बंध घातले आहेत. आपल्या देशात अनेक महान व्यक्तींच्या जयंत्या अति उत्साहाने साजर्या केल्या जातात; परंतु कोरोनामुळे सर्व प्रकारच्या जयंत्या स्थगित करण्यात आल्या. सार्वजनिक ठिकाणी होणारे होळी सारखे सण देखील साजरे करण्यावर बंदी घालण्यात आली होती. मर्यादित जागेत आणि दक्षता घेऊन रंग खेळण्याचे सूचित करण्यात आले होते; कारण नागरिक बेजबाबदारपणाने वागले, तर तुम्ही सुपर-स्प्रेडर होऊन कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढू शकते.
सध्या महाराष्ट्रात राज्यातच नव्हे संपूर्ण देशात सर्वात मोठा उत्सव मानला जाणारा "गणेशोत्सव". ज्याद्वारे लोकमान्य टिळकांनी सर्वांना एकत्रीत येण्यासाठी जो उत्सव / परंपरा सुरू केली होती, त्या उत्सवाची लगबग सुरु आहे. मूर्तीकारांना कुलुपबंदचा ( Lockdown ) फटका बसलेला दिसतो. मूर्तीसाठी लागणारा कच्चा माल हा बाहेर राज्यांतून येतो आणि कुलुपबंदमुळे हा कच्चा माल पुरेसा उपलब्ध नव्हता. या वर्षी कोरोनाच महासंकट उभं आहे. गणेश उत्सव होणार नाही ? शहरी भागातील गणेश मंडळ मूर्ती खरेदी करणार कि नाही ? असे प्रश्न आता मूर्तीकारांना पडत आहेत. आता हा उत्सव पूर्वीसारखा जल्लोषात आणि अतिउत्साहात साजरा करण्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे. हा उत्सव समारंभ साजरा करण्यावर काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हटल्याप्रमाणे, "गणेश मूर्तीची उंची मर्यादित असणार आहे." त्याचप्रमाणे "एक गाव, एक गणपती" हि संकल्पना आता रुजू होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या भीतीमुळे आता सार्वजनिक ऐवजी घरगुती उत्सव करण्यात येणार. दिवाळी या सणापर्यंत आता कुठलाही सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास मनाई असणार आहे.
Precautions during Celebration (उत्सवाच्या आनंदाबरोबर काळजी हि घ्या).....
- सर्वांनी मास्क लावलेले असावे.
- sanitizer चा वेळोवेळी वापर करावा.
- सुरक्षित अंतर ठेऊन बोलावे.
- विनाकारण नाक, डोळे, तोंडला हात लाऊ नका.
- घरी आल्यावर अंघोळ करावी.
Delta plus - सध्या डेल्टा प्लसची भीती जास्त
डेल्टा हा कोरोनाचा mutant होऊन तयार झालेला Variant आहे. याचबरोबर आता डेल्टा प्लस विषाणू आढळल आहे. तो सध्या अति घातक मानला जात आहे. कारण इतर mutants च्या तुलनेत हा जास्त संसर्गजन्य आहे. डेल्टाचे रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर तो हळू हळू कमी देखील होत आहे त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही. परंतु आता mutant मध्ये mutant झालेलं दिसत आहे. म्हणजेच कोरोनामध्ये mutant होऊन डेल्टा ची निर्मिती झाली व डेल्टा मध्ये mutant होऊ डेल्टा प्लस variant ची निर्मिती झाली. दुसरी लाट आटोक्यात येत असल्याचे लक्षण दिसत होते; परंतु आता कोरोनामध्ये mutant होत आहेत आणि हे mutant अजून वाढतील का ? हि चिंता सध्या लागून आहे. देशात अनेक राज्यात हा डेल्टा प्लस विषाणू आढळला. त्यामुळे आता आपण सर्वांनी आपली स्वतःची काळजी घेण वाढवलं पाहिजे.
कोरोना कधी जाणार हे तर सध्या सांगणे अशक्यच परंतू सर्व प्रकारचे सण-उत्सव असो, सार्वजनिक कार्यक्रम असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असो आपण सर्वांनी नियमांचे पालन करूनच या क्षणांचा आनंद घ्यायचा आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubts, Please let me know