कुठलीही महामारी साधारणतः आरोग्यासंबंधीचे संकट असते. महामारी म्हटल्यानंतर ती आरोग्यास घातक आणि प्राणघातक असणारच. आजच्या तारखेला कोरोनासारखी महामारी पहावयास मिळत आहे. याचाच परिणाम म्हणून अनेक मृत्यु देखील पहावयास मिळत आहेत. कधी-कधी विचार यतो कि, हे कोरोना महामारीचं दोन दिवसच स्वप्न असावं आणि आता झोपेतून उठून डोळे चोळत बाहेर डोकून बघावं आणि सर्व काही पूर्ववत ( कोरोना येण्यापूर्वीची परिस्थिती ) दिसावं. पण दुर्दैव आहे कि, हे स्वप्न नाहीच. त्यामुळे लढाव लागेल.
इतर लहान मोठे आजार असतील किंवा संसर्गजन्य नसणारे रोग असतील त्यावर आपण जास्त लक्ष देत नाही; परंतु कोरोनासारखी महामारी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, न्यायिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय अशा सर्वच क्षेत्रांच्या मोठ्या नुकसानीचे किंवा ऱ्हासाचे कारण ठरते.
या कोरोना महामारीने अगदी धार्मिक क्षेत्रावरही मोठा परिणाम घडवून आणल्याच चित्र दिसत. कुलुपबंदमुळे देशात गेली अनेक महिने मंदिरे, मस्जीद, गुरुद्वारा, चर्च बंद होते. तेव्हा भाविकांची तळमळ होताना दिसली. भक्त मंदिरे, मस्जीद, गुरुद्वारा, चर्च उघडण्याची आतुरतेने वाट बघत होते. नवरात्री दरम्यान धर्मगुरू, पुजारी यांना कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत, भाविकांना पूजा-पाठ करण्यास मज्जाव असावा असे सांगण्यात आले होते. त्याऐवजी घरामध्येच पूजा- पाठ करण्यास प्रोत्साहन द्यावे असे सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे कोरोनाच जलद गतीने होणार संक्रमण पाहता, मुस्लीम बांधवांचा सण एदुल फितर यासाठी मस्जीद मध्ये एकत्र न येण्याचे आव्हान केले गेले होते.
पंढरपूर यात्रा :
देशातील महाराष्ट्र राज्यात दरवर्षी आषाढी एकादशीला केली जाणारी वारी म्हणजे पंढरपूरची यात्रा, या वारीलाचा आषाढी वारी म्हणून देखील संबोधले जाते. लोक लाखोंच्या संखेने या यात्रेत सहभागी होतात. जुलै महिन्यात हि यात्रा असते; परतू लोक जून महिन्यापासून यात्रेस सुरुवात करतात. कोरोनामुळे मे महिन्यात वारकऱ्यांनी पंढरपूरला बसने जावे असे सांगण्यात आले होते. तसेच लस घेणे अनिवार्य करण्यात आले होते. परंतु आता कोरोनाचा डेल्टा प्लस नावाचा नवीन variant तयार झाला आहे व तो अतीघातक असून तो जलद गतीने संक्रमित होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने चे नियम लागू केले आहेत त्यानुसार यंदाची आषाढी वारी पंढरपूरला निघेल. या शासन नियमावलीनुसार यंदाही मानाच्या दहा पालक्यांनाच वारीची परवानगी देण्यात आलेली आहे. या पालख्यांना सुद्धा रथा ऐवजी वाहनांमधून न्यावयाचे आहे. या पालख्या विशेष वाहनाद्वारे वाखरीला पोहोचल्यानंतर पंढरपूर कडे १.५ किलोमीटर पर्यंत पायी वारी करतील. आता हे निर्बंध उठवण्यात येतील का ? वारकरी वारीसाठी जाऊ शकतील कि नाही ? असे प्रश्न सर्व जनतेच्या मनात आहेत.
अशाप्रकारे या कोरोनाच्या संकटामुळे पूर्ण महाराष्ट्र मधून किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेरील वारकरी लाखोच्या संख्येने पायी पंढरपूरला जाण्याचे जे पूर्वी पासूनची चालत आलेल्या परंपरेला यावर्षीही खंड पडला आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी एकच प्रार्थना आहे की, पुढच्या वर्षी पर्यंत तरी सर्व काही पूर्वरत व्हावं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तुझ्या भक्ताला पुढच्या वर्षी तरी पायी वारी मध्ये पंढरपूरला येता याव...!
गंगेची दमकोंडी :
भारतात गंगा नदीला धार्मिक दृष्ट्या अनन्य साधारण महत्त्व आहे. गंगा नदी हि पवित्र मानली जाते. या नदी किनारी अनेक धार्मिक विधी पार पडल्या जातात. गंगा नदीत अनेकजण स्नान करून आपले सर्व पाप धुतले गेले व पवित्र झाल्याच समाधान मिळवतात. गंगा किनारी पूजा-पाठ, अंत्य विधीसंबंधी कार्य केले जाते. एवढेच नव्हे तर याच गंगा नदीच्या पाण्यात व्यक्तीच्या मृत्युनंतर अस्थी विसर्जित केल्या जातात. परतू आज याच आपल्या गंगामाईचा श्वास कोंडतो आहे.
कोरोना पूर्वीच्या काळात प्रदूषणामुळे नदी पात्र घाण केले होते. नदी पात्रात कपडे धुणे असो, जनावरे धुणे असो किंवा कंपनी मधील रसायनयुक्त पाणी सोडणे या सर्वांनी पाणी दुषित होते, वापरण्यायोग्य राहत नाही. हे कमी होत कि काय म्हणून आता कोरोना मुळे कशी दुरवस्था झाली बघा.
कोरोनामुळे लाखो लोक मृत्युमुखी पडले. मृत पावणाऱ्या लोकांची संख्या देशभरात एवढी वाढली कि त्यांच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमी कमी पडू लागली. त्यामुळे लोकांना कुठे हि जाळण्याची प्रक्रिया सुरु होती. असच एक चित्र वाराणसी येथील. वाराणसी (उत्तर प्रदेश) येथे लोकांच्या अंत्यविधीसाठी जागा कमी पडू लागल्याने लोकांना जमिनीत पुरण्याचा प्रकार सुरु झालेला दिसून आला. येथील नदीकाठी किनार्यावर शेकडो लोक जमीनदोस्त (जमिनीत गाडणे) करण्यात आले. काही ठिकाणी तर मृत शव पाण्यात वाहून जाताना दिसले. गंगा नदीला पूर येऊन जेव्हा तिची पाणी पातळी वाढेल तेव्हा हे नदीकाठी पुरले गेलेले शव पाण्यात आपोआप वाहून जाणार आणि प्रदूषणाची पातळी कशी आणि कुठपर्यंत वाढेल याची कल्पना न करणेच बरे; या कृतीचा परिणाम नक्कीच भयानक असणार आहे. हे किती महागात पडेल ..?
२०२१ चा कुंभमेळा :
दोन महिन्यापूर्वी हरिद्वार येथे कुंभमेळा भरला होता. पूजा-पाठ करते वेळी असो किंवा स्नान करते वेळी असो सर्वजण एकत्र दिसले, ते हि विनामास्क, विना सामाजिक / शारीरिक अंतर पाळता. हि अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे, नाही...? कुंभमेळा नक्कीच धार्मिकदृष्ट्या परंपरेने चालत आलेला पवित्र असा मेळावा आहे. परंतु आज कोरोनामुळे जी काही भयावह स्थिती झाली आहे, ती लक्षात घेऊन नियम पाळून चालायला हव होतं. ते दिसून आलं नाही.
धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या, कोरोना हा देवाचा प्रकोप असून मानव जातीसाठी शिक्षा आहे किंवा मानवी पर्यावरणाविषयी आक्रमक वृत्तीमुळे व काळजी न घेतल्याने कोरोनाची उत्पत्ती झाली आहे, असं वेगवेगळ मत व्यक्त केल जात आहे.
आजपर्यंत मानवाने पर्यावरणाचा ऱ्हास केला आणि करत आहे. झाडे तोड थांबवा, वेगवेगळ्या रसायनयुक्त पाण्याचा नदीत सोडण्याचा प्रकार बंद करा, जनावरे, पशु प्राणी पक्षी याची शिकार न करता रक्षण करा यामुळे मानवास जिवंत राहण्यासाठी अतिआवश्यक असणारा प्राणवायु (Oxygen) नष्ट होत आहे, असं वेळोवेळी सांगण्यात आलं; तरीही आपण ऐकूण दुर्लक्ष केले आणि आजही करत आहोत. यामुळे आता खरच कोरोना हि अखंड मानव जातीला देवाने दिलेली शिक्षा तर नाही ना ? असा आगळा-वेगळा प्रश्न पडण्याची वेळ आली आहे.
Corona update :
महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येणार ?
महराष्ट्रात सध्या unlock झालेलं आहे, त्यामुळे आता तिसरी लाट येणार का ? अशी चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर तिसर्या लाटेवर डेल्टाचा परिणाम काय असणार ? असाही प्रश्न आहे. तिसरी लाट येण्याचा अंदाज गेल्या महिन्यातच वर्तवला गेला होता. त्यामुळे आता पुढील दोन ते चार आठवड्यात तिसरी लाट येण्याची संभावना आहे. तिसरी लाट किती गंभीर असेल ? महराष्ट्रात पहिल्या लाटेमध्ये positive होणार्यांची संख्या अठरा लाखांच्या वर होती व दुसऱ्या लाटेत positive होणाऱ्यांची संख्या चाळीस लाखांपेक्षा जास्त होती. आता तिसर्या लाटेतील रुग्णांची संख्या आठ लाखाजवळ असेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
उत्तर प्रदेश मधील डेल्टा प्लस :
कोरोनामध्ये mutation होऊन डेल्टा नावाचा variant तयार झाला होता. आता डेल्टामध्ये mutation होऊन डेल्टा प्लस असा नवीन variant तयार झाला आहे. म्हणजेच mutation मधेच mutation झालेलं पाहायला मिळत आहे. डेल्टा जलद गतीने संक्रमण करत असला तरीही तो गंभीर नाही असं सांगितलं जात आहे. भारतात डेल्टा प्लस विषाणू उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश मध्ये आढळला होता.
जर बाहेरील देशाचा विचार केला तर हा विषाणू UK (United Kingdom) मध्ये आढळला. येथे २ रुग्ण असे आढळून आले कि, ज्यांना लसीचे दोन डोस दिले असतांनाही त्यांना या (डेल्टा प्लस) विषाणूची लागण झाली.
अशा प्रकारे mutation मध्ये mutation बघायला मिळत आहे. त्यामुळे देशात पुढील परिस्थिती काय असेल हे न सांगाण्याजोगे. मात्र आपण आपली स्वतःची काळजी घेत राहणे, हे नक्कीच आपले कर्तव्य.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubts, Please let me know