गुरुवार, ९ डिसेंबर, २०२१

CDS General Bipin Rawat Death (तमिळनाडू)| भारताचे पहिलेच संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत अपघाती मृत्यू | Bipin Rawat Awards/medals | Bipin Rawat education

Bipin Rawat education | Salary | Defence work | Bipin Rawat Awards/medals | Bipin Rawat RIP

भारताचे पहिलेच संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत अपघाती मृत्यू | लढवय्या गमावला 


भारतीय सैन्यदलाचा आधुनिककार 


 CDS General Bipin Rawat Death : भारताचे पहिलेच संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूनं भारतच नाही तर पाकिस्तानातही हळहळ व्यक्त केली जातेय.

सरसेनाअध्यक्ष जनरल बिपीन रावत (६२ वय) व अन्य काही जणांना घेऊन जाणारे भारतीय हवाई दलाचे 'MI-१७ V-५ ' हे हेलिकॉप्टर तमिळनाडूतील कुन्नूरजवळील घनदाट जंगलात कोसळले. यात जनरल बिपीन रावत त्यांचा पत्नी मधुलिका रावत व अन्य अकरा जणांचा अपघाती मृत्यू झाला.

पाकिस्तानचे 'जॉईंट चीफ ऑफ स्टाफ कमिटी' (CJCSC) प्रमुख जनरल नदीम रझा तसंच पाकिस्तानचे लष्करप्रमुख (COAS) जनरल कमर जावेद बाजवा यांनी भारतीय संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी (spouseमधुलिका रावत यांच्या मृत्यूवर (death) शोक व्यक्त केला आहे. पाकिस्तान सशस्त्र दलाचे प्रवक्त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून अधिकृतरित्याही माहिती देण्यात आली आहे.




जनरल बिपीन रावत यांना भारतीय सैन्यदलाचे आधुनिककार मानले जाते. त्यांचा चीन व पाकिसतानी आव्हानांना पुरून उरणारा महत्वाचा दुवा अकाली निधनाने आपण गमावला आहे. 


लढवय्या जनरल बिपीन रावत : लष्करी पार्श्वभूमी 

जनरल बिपीन रावत यांनी लष्करात चाळीस वर्षे सेवा केली. त्यांचा जन्म (Born) १६ मार्च १९५८ रोजी उत्तराखंडमधील (uttarakhand, paudi) पौडी येथे झाला. शालेय शिक्षण त्यांनी शिमाल्यातील क्याबरीअन हौल स्कूलमध्ये घेतले. वडील लेफ्टनंट जनरल लक्ष्मण सिंग रावत, वडिलांच्या पावलावर पाउल ठेवत, त्यांनी लष्करात प्रवेश केला. लष्कराचे प्रतिनिधी म्हणून बिपीन रावत यांनी बाहेरील देशांना भेटी दिल्या. तानंतर त्यांनी नेपाळच्या लष्कराचे सन्माननीय जनरल पद भूषविले होते. २०१५ मध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात ते वाचले होते. 

२० ऑक्टोबर २०११ रोजी ते मेजर जनरल, १ जून २०१४ रोजी लेफ्टनंट जनरल आणि १ जानेवारी २०१७ रोजी जनरल म्हणून नियुक्त झाले. 


कामगिरी 

त्यांच्या काळात २०१६ मध्ये पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राईक (Surgical strike) चे नियोजन होऊन, भारतीय लष्कराने  (Indian Army) पाकव्याप्त भाग काश्मीर येथे घुसून कारवाई केली होती. लष्करातील कामगिरीबद्दल जनरल रावत यांना 'परम विशिष्ट सेवा मेडल', उत्तम युध्द सेवा मेडल', युध्द सेवा मेडल', सेना मेडल' यांनी गौरविण्यात आले होते.  











रविवार, २७ जून, २०२१

Effects of covid on Religious things (धार्मिक गोष्टींवर कोरोनाचा झालेला परिणाम )....

 

    कुठलीही महामारी साधारणतः आरोग्यासंबंधीचे संकट असते. महामारी म्हटल्यानंतर ती आरोग्यास घातक आणि प्राणघातक असणारच. आजच्या तारखेला कोरोनासारखी महामारी पहावयास मिळत आहे. याचाच परिणाम म्हणून अनेक मृत्यु देखील पहावयास मिळत आहेत. कधी-कधी विचार यतो कि, हे कोरोना महामारीचं दोन दिवसच स्वप्न असावं आणि आता झोपेतून उठून डोळे चोळत बाहेर डोकून बघावं आणि सर्व काही पूर्ववत ( कोरोना येण्यापूर्वीची परिस्थिती ) दिसावं. पण दुर्दैव आहे कि, हे स्वप्न नाहीच. त्यामुळे लढाव लागेल.

इतर लहान मोठे आजार असतील किंवा संसर्गजन्य नसणारे रोग असतील त्यावर आपण जास्त लक्ष देत नाही; परंतु कोरोनासारखी महामारी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, न्यायिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय अशा सर्वच क्षेत्रांच्या मोठ्या नुकसानीचे किंवा ऱ्हासाचे कारण ठरते. 

या कोरोना महामारीने अगदी धार्मिक क्षेत्रावरही मोठा परिणाम घडवून आणल्याच चित्र दिसत. कुलुपबंदमुळे देशात गेली अनेक महिने मंदिरे, मस्जीद, गुरुद्वारा, चर्च बंद होते. तेव्हा भाविकांची तळमळ होताना दिसली. भक्त मंदिरे, मस्जीद, गुरुद्वारा, चर्च उघडण्याची आतुरतेने वाट बघत होते. नवरात्री दरम्यान धर्मगुरू, पुजारी यांना कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत, भाविकांना पूजा-पाठ करण्यास मज्जाव असावा असे सांगण्यात आले होते. त्याऐवजी घरामध्येच पूजा- पाठ करण्यास प्रोत्साहन द्यावे असे सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे कोरोनाच जलद गतीने होणार संक्रमण पाहता, मुस्लीम बांधवांचा सण एदुल फितर यासाठी मस्जीद मध्ये एकत्र न येण्याचे आव्हान केले गेले होते. 


पंढरपूर यात्रा : 

  देशातील महाराष्ट्र राज्यात दरवर्षी आषाढी एकादशीला केली जाणारी वारी म्हणजे पंढरपूरची यात्रा, या वारीलाचा आषाढी वारी म्हणून देखील संबोधले जाते. लोक लाखोंच्या संखेने या यात्रेत सहभागी होतात. जुलै महिन्यात हि यात्रा असते; परतू लोक जून महिन्यापासून यात्रेस सुरुवात करतात. कोरोनामुळे मे महिन्यात वारकऱ्यांनी पंढरपूरला बसने जावे असे सांगण्यात आले होते. तसेच लस घेणे अनिवार्य करण्यात आले होते. परंतु आता कोरोनाचा डेल्टा प्लस नावाचा नवीन variant तयार झाला आहे व तो अतीघातक असून तो जलद गतीने संक्रमित होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने चे नियम लागू केले आहेत त्यानुसार यंदाची आषाढी वारी पंढरपूरला निघेल. या शासन नियमावलीनुसार यंदाही मानाच्या दहा पालक्यांनाच वारीची परवानगी देण्यात आलेली आहे. या पालख्यांना सुद्धा रथा ऐवजी वाहनांमधून न्यावयाचे आहे. या पालख्या विशेष वाहनाद्वारे वाखरीला पोहोचल्यानंतर पंढरपूर कडे १.५ किलोमीटर पर्यंत पायी वारी करतील. आता हे निर्बंध उठवण्यात येतील का ? वारकरी वारीसाठी जाऊ शकतील कि नाही ? असे प्रश्न सर्व जनतेच्या मनात आहेत. 

  अशाप्रकारे या कोरोनाच्या संकटामुळे पूर्ण महाराष्ट्र मधून किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेरील वारकरी लाखोच्या संख्येने पायी पंढरपूरला जाण्याचे जे पूर्वी पासूनची चालत आलेल्या परंपरेला यावर्षीही खंड पडला आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी एकच प्रार्थना आहे की, पुढच्या वर्षी पर्यंत तरी सर्व काही पूर्वरत व्हावं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तुझ्या भक्ताला पुढच्या वर्षी तरी पायी वारी मध्ये पंढरपूरला येता याव...!


गंगेची दमकोंडी :

  भारतात गंगा नदीला धार्मिक दृष्ट्या अनन्य साधारण महत्त्व आहे. गंगा नदी हि पवित्र मानली जाते. या नदी किनारी अनेक धार्मिक विधी पार पडल्या जातात. गंगा नदीत अनेकजण स्नान करून आपले सर्व पाप धुतले गेले व पवित्र झाल्याच समाधान मिळवतात. गंगा किनारी पूजा-पाठ, अंत्य विधीसंबंधी कार्य केले जाते. एवढेच नव्हे तर याच गंगा नदीच्या पाण्यात व्यक्तीच्या मृत्युनंतर अस्थी विसर्जित केल्या जातात. परतू आज याच आपल्या गंगामाईचा श्वास कोंडतो आहे. 

कोरोना पूर्वीच्या काळात प्रदूषणामुळे नदी पात्र घाण केले होते. नदी पात्रात कपडे धुणे असो, जनावरे धुणे असो किंवा कंपनी मधील रसायनयुक्त पाणी सोडणे या सर्वांनी पाणी दुषित होते, वापरण्यायोग्य राहत नाही. हे कमी होत कि काय म्हणून आता कोरोना मुळे कशी दुरवस्था झाली बघा.

कोरोनामुळे लाखो लोक मृत्युमुखी पडले. मृत पावणाऱ्या लोकांची संख्या देशभरात एवढी वाढली कि त्यांच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमी कमी पडू लागली. त्यामुळे लोकांना कुठे हि जाळण्याची प्रक्रिया सुरु होती. असच एक चित्र वाराणसी येथील. वाराणसी (उत्तर प्रदेश) येथे लोकांच्या अंत्यविधीसाठी जागा कमी पडू लागल्याने लोकांना जमिनीत पुरण्याचा प्रकार सुरु झालेला दिसून आला. येथील नदीकाठी किनार्यावर शेकडो लोक जमीनदोस्त (जमिनीत गाडणे) करण्यात आले. काही ठिकाणी तर मृत शव पाण्यात वाहून जाताना दिसले. गंगा नदीला पूर येऊन जेव्हा तिची पाणी पातळी वाढेल तेव्हा हे नदीकाठी पुरले गेलेले शव पाण्यात आपोआप वाहून जाणार आणि प्रदूषणाची पातळी कशी आणि कुठपर्यंत वाढेल याची कल्पना न करणेच बरे; या कृतीचा परिणाम नक्कीच भयानक असणार आहे. हे किती महागात पडेल ..? 


२०२१ चा कुंभमेळा :

  दोन महिन्यापूर्वी हरिद्वार येथे कुंभमेळा भरला होता. पूजा-पाठ करते वेळी असो किंवा स्नान करते वेळी असो सर्वजण एकत्र दिसले, ते हि विनामास्क, विना सामाजिक / शारीरिक अंतर पाळता. हि अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे, नाही...? कुंभमेळा नक्कीच धार्मिकदृष्ट्या परंपरेने चालत आलेला पवित्र असा मेळावा आहे. परंतु आज कोरोनामुळे जी काही भयावह स्थिती झाली आहे, ती लक्षात घेऊन नियम पाळून चालायला हव होतं. ते दिसून आलं नाही. 



धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या, कोरोना हा देवाचा प्रकोप असून मानव जातीसाठी शिक्षा आहे किंवा मानवी पर्यावरणाविषयी आक्रमक वृत्तीमुळे व काळजी न घेतल्याने कोरोनाची उत्पत्ती झाली आहे, असं वेगवेगळ मत व्यक्त केल जात आहे. 


आजपर्यंत मानवाने पर्यावरणाचा ऱ्हास केला आणि करत आहे. झाडे तोड थांबवा, वेगवेगळ्या रसायनयुक्त पाण्याचा नदीत सोडण्याचा प्रकार बंद करा, जनावरे, पशु प्राणी पक्षी याची शिकार न करता रक्षण करा यामुळे मानवास जिवंत राहण्यासाठी अतिआवश्यक असणारा प्राणवायु (Oxygen) नष्ट होत आहे, असं वेळोवेळी सांगण्यात आलं; तरीही आपण ऐकूण दुर्लक्ष केले आणि आजही करत आहोत. यामुळे आता खरच कोरोना हि अखंड मानव जातीला देवाने दिलेली शिक्षा तर नाही ना ? असा आगळा-वेगळा प्रश्न पडण्याची वेळ आली आहे.


Corona update : 

महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येणार ?  

  महराष्ट्रात सध्या unlock झालेलं आहे, त्यामुळे आता तिसरी लाट येणार का ? अशी चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर तिसर्‍या लाटेवर डेल्टाचा परिणाम काय असणार ? असाही प्रश्न आहे. तिसरी लाट येण्याचा अंदाज गेल्या महिन्यातच वर्तवला गेला होता. त्यामुळे आता पुढील दोन ते चार आठवड्यात तिसरी लाट येण्याची संभावना आहे. तिसरी लाट किती गंभीर असेल ? महराष्ट्रात पहिल्या लाटेमध्ये positive होणार्‍यांची संख्या अठरा लाखांच्या वर होती व दुसऱ्या लाटेत positive होणाऱ्यांची संख्या चाळीस लाखांपेक्षा जास्त होती. आता तिसर्‍या लाटेतील रुग्णांची संख्या आठ लाखाजवळ असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. 

 

उत्तर प्रदेश मधील डेल्टा प्लस :

कोरोनामध्ये mutation होऊन डेल्टा नावाचा variant तयार झाला होता. आता डेल्टामध्ये mutation होऊन डेल्टा प्लस असा नवीन variant तयार झाला आहे. म्हणजेच mutation मधेच mutation झालेलं पाहायला मिळत आहे. डेल्टा जलद गतीने संक्रमण करत असला तरीही तो गंभीर नाही असं सांगितलं जात आहे. भारतात डेल्टा प्लस विषाणू उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश मध्ये आढळला होता. 

जर बाहेरील देशाचा विचार केला तर हा विषाणू UK (United Kingdom) मध्ये आढळला. येथे २ रुग्ण असे आढळून आले कि, ज्यांना लसीचे दोन डोस दिले असतांनाही त्यांना या (डेल्टा प्लस) विषाणूची लागण झाली.

 अशा प्रकारे mutation मध्ये mutation बघायला मिळत आहे. त्यामुळे देशात पुढील परिस्थिती काय असेल हे न सांगाण्याजोगे. मात्र आपण आपली स्वतःची काळजी घेत राहणे, हे नक्कीच आपले कर्तव्य.


       

          



           








मंगळवार, २२ जून, २०२१

Effects of Covid on Our Festivities (कोरोना व सण-उत्सव )....

  पूर्वी पासूनच आपल्याला स्वत:ची काळजी घेण्यासाठी काही सुचना दिल्याचे पुराणिक / धार्मिक साहित्यात आढळते. खालील ओळी आपल्या अशीच शिकवण देतात- 

Clear instructions taught by puranas and vedas in 5000 BC to prevent Pandemic by  maintaining perfect hygiene. 

  •  लवणं व्यञ्जनं चैव घृतंतैलं तथैव च । लेह्यं पेयं च विविधं हस्तदत्तं न भक्षयेत् ।।धर्मसिन्धू ३पू. आह्नि     (Salt, ghee, oil, rice and other food items should not be served with bare hand. Use spoons to serve.)                                                                                                                                         
  • अनातुरः स्वानि खानि न स्पृशेदनिमित्ततः ।।  मनुस्मृति ४/१४४
    (Without a reason don't touch your own indriyas (organs like eyes, nose, ears, etc.)

  • हस्तपादे मुखे चैव पञ्चाद्रे भोजनं चरेत् ।।  पद्म०सृष्टि.५१/८८ नाप्रक्षालितपाणिपादो भुञ्जीत ।। सुश्रुतसंहिता चिकित्सा २४/९८
    (Wash your hands, feet, mouth before you eat.)


वरील सूचना सनातन धर्मात इ.स. पाच हजार वर्षापूर्वीचं दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे आपण माहिती असून हि दुर्लक्ष करतो तर काही वेळा माहितीचा अभाव असतो म्हणून आपण काळजी  घेत नाही. थोडक्यात Precaution is Better Than Cure, हेच आपल्याला खूप वर्षापूर्वीच सांगितलेलं आहे परंतु आपण आधुनिकते च्या नावाखाली आणि वेळेच्या अभावाचे कारण समोर करून सर्व काही विसरून जात आहोत. त्याच बरोबर मानवी प्रगति पायी निसर्गाचा अतोनात र्हास करत आहोत. त्याचीच किंमत म्हणजे अखंड मानव जातीवर ओढवलेलं "कोरोना" नावाचं संकट. कोरोनाच आगमन झाल्यापासून आपल्या सर्वांच्याच सुख - दुख:च्या सर्वच कार्यकर्मावर गदा आली आहे. आपण कुठलेही सण-उत्सव, कार्यकर्म, सोहळे पूर्वीप्रमाणे साजरे करू शकलो नाहीत. 


आपण आज पाहू शकतो कि, कोरोनाच्या कठीण काळात सण-उत्सव साजरे करण्यावर अनेक निर्बंध घातले आहेत. आपल्या देशात अनेक महान व्यक्तींच्या जयंत्या अति उत्साहाने साजर्‍या  केल्या जातात; परंतु कोरोनामुळे सर्व प्रकारच्या जयंत्या स्थगित करण्यात आल्या. सार्वजनिक ठिकाणी होणारे होळी सारखे सण देखील साजरे करण्यावर बंदी घालण्यात आली होती. मर्यादित जागेत आणि दक्षता घेऊन रंग खेळण्याचे सूचित करण्यात आले होते; कारण नागरिक बेजबाबदारपणाने वागले, तर तुम्ही सुपर-स्प्रेडर  होऊन कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढू शकते.  




   सध्या महाराष्ट्रात राज्यातच नव्हे संपूर्ण देशात सर्वात मोठा उत्सव मानला जाणारा "गणेशोत्सव". ज्याद्वारे लोकमान्य टिळकांनी सर्वांना एकत्रीत येण्यासाठी जो उत्सव / परंपरा सुरू केली होती, त्या  उत्सवाची लगबग सुरु आहे. मूर्तीकारांना  कुलुपबंदचा ( Lockdown ) फटका बसलेला दिसतो. मूर्तीसाठी लागणारा कच्चा माल हा बाहेर राज्यांतून येतो आणि कुलुपबंदमुळे हा कच्चा माल पुरेसा उपलब्ध नव्हता. या वर्षी कोरोनाच महासंकट उभं आहे. गणेश उत्सव होणार नाही ? शहरी भागातील गणेश मंडळ मूर्ती खरेदी करणार कि नाही ? असे प्रश्न आता मूर्तीकारांना पडत आहेत. आता हा उत्सव पूर्वीसारखा जल्लोषात आणि अतिउत्साहात साजरा करण्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे.  हा उत्सव समारंभ साजरा करण्यावर काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हटल्याप्रमाणे, "गणेश मूर्तीची उंची मर्यादित असणार आहे." त्याचप्रमाणे "एक गाव, एक गणपती" हि संकल्पना आता रुजू होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या भीतीमुळे आता सार्वजनिक ऐवजी घरगुती उत्सव करण्यात येणार. दिवाळी या सणापर्यंत आता कुठलाही सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास मनाई असणार आहे. 




Precautions during Celebration (उत्सवाच्या आनंदाबरोबर काळजी हि घ्या).....

  1.  सर्वांनी मास्क लावलेले असावे. 
  2.  sanitizer चा वेळोवेळी वापर करावा. 
  3. सुरक्षित अंतर ठेऊन बोलावे. 
  4. विनाकारण नाक, डोळे, तोंडला हात लाऊ नका.
  5. घरी आल्यावर अंघोळ करावी. 



Delta plus  - सध्या डेल्टा प्लसची भीती जास्त 

डेल्टा हा कोरोनाचा mutant होऊन तयार झालेला Variant आहे. याचबरोबर आता डेल्टा प्लस विषाणू आढळल आहे. तो सध्या अति घातक मानला जात आहे. कारण इतर mutants च्या तुलनेत हा जास्त संसर्गजन्य आहे. डेल्टाचे रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर तो हळू हळू कमी देखील होत आहे त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही. परंतु आता mutant मध्ये mutant झालेलं दिसत आहे. म्हणजेच कोरोनामध्ये mutant होऊन डेल्टा ची निर्मिती झाली व डेल्टा मध्ये mutant होऊ डेल्टा प्लस variant ची निर्मिती झाली. दुसरी लाट आटोक्यात येत असल्याचे लक्षण दिसत होते; परंतु आता कोरोनामध्ये mutant होत आहेत आणि हे mutant अजून वाढतील का ? हि चिंता सध्या लागून आहे. देशात अनेक राज्यात हा डेल्टा प्लस विषाणू आढळला. त्यामुळे आता  आपण सर्वांनी आपली स्वतःची काळजी घेण वाढवलं पाहिजे. 

    कोरोना कधी जाणार हे तर सध्या सांगणे अशक्यच परंतू सर्व प्रकारचे सण-उत्सव असो, सार्वजनिक कार्यक्रम  असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असो आपण सर्वांनी नियमांचे पालन करूनच या क्षणांचा आनंद घ्यायचा आहे. 




































रविवार, १३ जून, २०२१

Effects of covid on society (कोरोनाचे सामाजिक जीवनावरील परिणाम).....

   मी आजारी पडते आणि कुठल्यातरी गंभीर आजारामुळे माझ्यावर शस्त्रक्रिया केली जाते. हि बाब कळते, तेव्हा माझे मित्र-मैत्रींनी, नातेवाईक, शेजारी, दफ्तरातील सहकारी मला फुलांचा बुके, फळे, खाऊ घेऊन भेटायला आतुरतेने येतात; कारण त्यांना काळजी लागून राहीलेली असते कि, मी बरी असेल कि नही ? अगदी याउलट हि दिसते; ते असे कि जेव्हा आपले  नातेवाईक आजारी असतात तेव्हा आपण हि त्यांना त्याच पद्धतीने भेटायला जातो जसे ते आपल्याला भेटायला आले होते. यातून पाच गोष्टी दिसून येतात - आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, कृतज्ञता, आणि माणुसकी. आणि हीच माणुसकी, कृतज्ञता जर मानवी स्वभावातून नाहीशी झाली तर .....?  

आजची परिस्थिती नमूद करण्याची येथे मुळीच गरज नाही. समाज हा मानावाला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी  महत्वाचा असतो. परस्परपूरक असणाऱ्या या समाजात मानवी नैतिक मुल्ये रुजलेली असतात. आणि जर नैतिक मुल्ये, माणुसकी आणि नातेसंबंध यांवर गदा आली तर....? 

हो, आज कोरोना महामारीने अक्षरशः मृत्युतांडव रचलेलं दिसतंय. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृध्द, शारीरिक ते मानसिक, राजकीय ते सामाजिक स्तर, ग्रामीण तो शहरी भाग, गरीब असो कि श्रीमंत, कनिष्ठ जातीचा असो वा वरिष्ठ, सांस्कृतिक असो कि शैक्षणिक, गृह्व्यवस्था ते अर्थव्यवस्था, पर्यावरण ते वातावरण अगदी सर्वच क्षेत्रांना कोरोनाने भरडून काढलेले दिसते. याचाच परिणाम म्हणून आज देशात माणुसकी हरपल्याचे  दृश्य दिसत आहेत. असे का ? 


वरील आजारपणाबद्दल सांगणे/भविष्यातील मानवी वृत्तीचा तर्क लावण्यामागचा उद्देश काय ?

आज मितीला कोरोनाची स्थिती पाहता, सामाजिक आरोग्य व मानव प्रजातीचं अस्तित्व धोक्यात आहे. मृतदेहांचे ढिगारे पहावयास मिळत आहेत. याच कलहातून व्यक्तीमध्ये मानसिक ताणताणाव निर्माण होऊन, मानवी स्वभावामध्ये अनेक बदल झालेले दिसतात. मग ते सामाजिक असो कि राजकीय स्तरावर किंवा शारीरिक असो कि मानसिक. याला सतत कुलुपबंद स्थितीत राहणे, बेरोजगारी, कौटुंबिक मतभेद, निराशा अशा गोष्टी जबाबदार असू शकतात. कोरोनाच्या उद्रेकामुळे लोक आज एवढे भांबावून गेले आहेत कि, त्यांनाच कळात नाही आहे कि आपल्या अवतीभोवती काय चालू आहे. जसे कि कुठे लसीकरण सुरु आहे तर कुठे लसींकरणाचा अभाव, कुठे औषधांचा काळा बाजार सुरु आहे तर कुठे हिंसाचार, अविवेकीपणा, बहिष्कार किंवा वाळीत टाकण्यासारख्या गोष्टी.      


One such Incident (अशीच एक घटना)  

हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर. डॉक्टरांनी एक दिवस अस्वस्थपणा जाणवत असल्याने स्वतःची RT-PCR चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट  covid positive आला. लक्षणे तशी सौम्य होती मात्र; स्वतःला आणि इतरांना हि त्रास नको म्हणून काही दिवस त्यांना घरात विलागीकारणाचा सल्ला देण्यात आला. ते एका सोसायटी मध्ये राहत असत. त्यांनी सोसायटीच्या आत  प्रवेश केला व घराचा दरवाजा उघडन्यापूर्वीच त्यांना आत प्रवेश करून तेथे राहण्यास मज्जाव करण्यात आला. त्यानंतर नाईलाजाने त्यांना हॉस्पिटलच्या स्टोअर रूममध्ये रहाव लागलं........सांगण्याचा उद्देश हा कि,असा मज्जाव करणे योग्य नाही. ते नैतिकतेमध्येहि बसत नाही. आपण रुग्णाला आश्रय देऊन सामाजिक/शारीरिक अंतर ठेऊन रुग्णाची देखभाल करायला हवी. आपण आपली नैतिक मूल्ये विसरून चालणार नाही. कारण समाजात नैतिकतेची पाळेमुळे रुजलेली असतात. आणी याच समाजात आपण असा तुटकपणा आणि अविवेकीपणा दाखवणे म्हणजे हळू-हळू माणुसकीला तडा बसनेच होईल.



Migration (स्थलांतर) 

पोटाची खळगी भरण्यासाठी आणि आपल्या मुलाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी लोक गावाकडून शहराकडे रोजगाराच्या शोधात स्थलांतर करतात. भारत देशात चौदा कोटी लोक स्थलांतरित आहेत. या स्थलांतरित लोकांमध्ये हातावर पोट असणारे, अर्धवेळ काम करून शिक्षण घेणारे विद्यार्थी, मजूर, कामगार वर्ग, लघु व्यावसायिक, महिला कामगार इत्यादींचा समावेश आहे. या स्थालातारीतांना कोरोनाच्या धोक्यामुळे गावाकडे स्थलांतरित व्हावे लागले. त्यातील गर्भवती महिलांना किती त्रास झाला हे पुढील उदाहरणावरून लक्षात येईल -  

"ती" चे (गर्भवती) दिवस भरत आले होते. अचानक कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे कुलुपबंद करण्यात आले व ति गावाकडे स्थलांतर करण्यास प्रवृत्त झाली. अशा अवस्थेत हि, एक हात पोटावर व दुसरा कमरेवर ठेवून ती अनवाणी पायाने पती व दोन मुलांबरोबर पायपीट करत होती. स्वतःबरोबर अन्नाचा कण ही कि पाण्याचा थेंब हि नही अन स्वतः व कुटुंब उपाशी असताना ती रस्ता तुडवत होती. काहीक मैल चालत गेल्यानंतर तिला अचानक प्रसूती कळा सुरु झाल्या. सुदैवाने आसपासच्या महिलांनी तिला आधार देत तिची सुरक्षितपणे प्रसूती केली. तिने मुलीला जन्म दिला होता. त्या महिलांनी तिला व कुटुंबाला खायला अन्न आणि पाणी  दिल. थोड्याच वेळात ती उठून (सोबत पती अन तीन लेकर ) परत चालू लागली.......यातील  सुदैवाचा भाग असा कि, गर्भवती महिलेला आधार मिळाला. तसेच तिची सुरक्षितरीत्या प्रसूती झाली आणि जच्चा व बच्चा दोन्ही सुखरूप होते. येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, यासारख्या  कितीतरी महिला आहेत ज्यांना  अशा  कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागणे. 


Boycott  (बहिष्कार) 

एखाद्या गावातील निम्न/कनिष्ठ जातीतील पुरुषाचा मृत्यू (कोरोनाने नाही, इतर कारणाने ) होतो. त्या  व्यक्तीला मुलगा नसून, सात मुली असतात्त. जेव्हा त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते; तेव्हा कुठलाच नागरिक त्या मृत व्यक्तीस खांदा देण्यास तयारी दाखवत नाही. कारण मृत व्यक्तीच्या कुटुंबावर समाजातील लोकांनी बहिष्कार टाकलेला असतो.. त्या कुटुंबाला  वाळीत टाकण्यात आलेले असते. शेवटी मृत व्यक्तीला तिच्या सात मुली खांदा देतात. अशी लज्जास्पद  घटना आपल्या समाजात घडू शकते हे आपण भाकीत हि करू शकत नाही. 

हा सर्व प्रकार कोरोनाच्या भितीमुळे पहावयास मिळतो. अशा अनेक घटना आपल्याला पहावयास मिळतात. त्या येथे नमूद करणे कठीण. लोकांच्या मनामध्ये कोरोनाची एवढी भीती निर्माण झाली आहे कि, लोक एकमेकांना घृणास्पद भावनेने बघत आहेत, इतरांचा तिटकारा करत आहेत. घरातील एखादी जरी व्यक्ती करोना positive आली, तर त्या व्यक्तीला देखील वाळीत टाकल्याप्रमाणे  वागणूक दिली जाते. वरील सर्व घटनांची चिकित्सा केली पाहिजे. यावरून असे लक्षात येईल कि करोना महामारीमुळे मानवी स्वभावात बदल होत चालला आहे. अशा कठीण काळात आपण एकमेकांना सोबत व धीर दिला पाहिजे. परंतु तस होताना दिसत नाही.समाजात माणुसकी टिकून ठेवायची असेल तर, कोरोनाला नात्यांवर स्वार होऊ देऊ नका.  


शेवटी वृद्ध पाण्याच्या प्रवाहात......

नांदेड जिल्ह्यातील विक्रमाबाद जवळची घटना. पूल पार करत असताना एक वृध्द आजोबा हातात काठी अन पायाचा थरकाप होतोय. पाण्याच्या प्रवाहात वाहून जातो कि काय...असे ते पुलावर उभे होते. पुलाच्या दोन्ही टोकाला बघ्यांची गर्दी होती. लोक या वृद्धास वाचवण्याऐवजी व्हिडीओ करत उभे होते. शेवटी पुलावरील पाण्याच्या प्रवाहात ते आजोबा वाहून गेले व त्याचा मृतदेह शेजारील एका तलावात आढळला. हि वृद्ध व्यक्ती वाहून गेल्यानंतर काही तरुण पुढे सरसावले. परंतु तेव्हा उपयोग काय ?..... हि घटना. 

येथे कोरोनाचा काहीही सबंध नव्हता. तरीही माणुसकी विसरून हे लोक व्हिडिओ शूट करत होते. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. विचार करण्यायोग्य बाब आहे.  

भविष्यात मानवी वृत्ती कशी असेल, हे तर जेव्हा - तेव्हा ची गोष्ट व त्याची कल्पना करणे हि कठीण. सध्याच्या स्थितीत आपण सर्वांनी कोरोनाला न घाबरता, या लढाईमध्ये जाती-जातीमध्ये भेद, एकमेकांबद्दलचा तिरस्कार, तुटकपणा सोडून देऊन लढण्यास सक्षम व्हावे. मानवी प्रजातीला काळाच्या आड जाण्यापासून प्रतिबंधित करावे. 






  

गुरुवार, १० जून, २०२१

Corona in India : Corona History, Symptoms, Treatment and Precautions…..

 

What is coronavirus ? ( कोरोना काय आहे ? )

कोरोना हा विषाणूंचा एक समूह आहे. हा एक अति संसर्गजन्य रोग आहे. या विषाणूचा सस्तन प्राणी व पक्षी यांच्या श्वसन संस्थेवर परिणाम होतो. त्याचप्रमाणे मानवास ही श्वसनास अडथळा निर्माण होतो. या विषाणूचा बऱ्याचदा सौम्य परिणाम जाणवतो; परंतु मधुमेही, उच्च रक्तदाब किंवा हृदय विकार असलेल्या व्यक्तीवर याचा घातक परिणाम हि होऊ शकतो.


https://tejaswiswritingroom.blogspot.com/2021/05/treatment-for-mis-c-and-how-it-linked.html

what is the history of coronavirus ? (कोरोनाचा इतिहास काय)

सुरुवातीस, सर्वात अगोदर हा विषाणू कोंबडी व दोन सर्दी झालेली असणाऱ्या व्यक्तींमध्ये  आढळला. यावर तपासणी करून शास्त्रज्ञांद्वारे कोरोना व्हायरस २२ E आणि ह्युमन कोरोना व्हायरस OC नाव देण्यात आले. 

तसेच या समूहामध्ये असणाऱ्या विषाणूंची ओळख खालीलप्रमाणे झाली -

     ·  २००३ मध्ये SARS-Cov (Severe Acute Respiratory Syndrome Cronavirus)

     ·  २००४ मध्ये HKW

     ·  २०१९ मध्ये SARS-Cov-२ (पूर्वी NCov नावाने ओळख असलेला).

अभ्यासानुसार सहा व्यक्तींपैकी एक जण गंभीर आजारी पडतो आणि ८०% लोक यातून उपचार न घेताच बरे होतात; कारण काही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसतात; परंतु कुठलाच त्रास होताना दिसत नाही. 


how did the coronavirus get it’s name ? (कोरोना नाव कसे दिले)

कोरोना विषाणूची रचना दिसण्यास, प्राचीन काळातील राजे-महाराजे डोक्यावर मुकुट घालत असत अगदी तसा आहे. त्यामुळे तज्ञांद्वारे या विषाणूस crown (मुकुट) या शब्दावरून latin भाषेतून “कोरोना” असे नाव देण्यात आले होते.


what are the names of corona ? (कोरोनाची नावे कोण-कोणती)

कोरोनाला तज्ञांनी अनेक नावे दिलेली आहेत. जसे कि –

   कोरोना - कारण या विषाणूची रचना हि crown प्रमाणे आहे.

  covid-१९कारण कोरोना महामारी २०१९ या वर्षामध्ये आली. आणि हे कोरोनाचे संक्षिप्त

  रूप होय. 

  वूहान व्हायरस – कारण चीन या देशातील वूहान या शहरामध्ये या विषाणूचा जन्म झाला. त्यामुळे वूहान या शहरारून हे नाव.

  चायनीज व्हायरस – चीन या देशात या विषाणूची उत्पत्ती झाली असून याच देशातून कोरोनाचे पूर्ण जगभरामध्ये संक्रमण झाले.

  नोवेल कोरोना व्हायरस - कारण नोवेल म्हणजे नवा होय. हा SARS (Severe Acute Respiratory Syndrome ) या कुटुंबातील नवीन विषाणू आहे. 



What covid-19 stands for  ?

या विषाणूला जी वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत, त्यातील एक नाव covid-१९. या विषाणूची लागण झालेल्या आजारास कोरोना बरोबरच covid-१९ असे म्हणतात. covid-१९ चा अर्थ co- corona, vi- Virus, d- disease, २०१९ या वर्षी आढळल्याने - १९ असा होतो. covid-१९ हे नाव Tedras Adamhyanom Gebreyesos  यांच्याद्वारे जिनिव्हा येथे एका पत्रकार परिषदेत देण्यात आले होते.      


symptoms of coronavirus ? (कोरोनाची लक्षणे कोणती)

कोरोना आजाराची वेगवेगळ्या व्यक्तीमध्ये विविध लक्षणे आढळून येतात. ताप, सर्दी, कोरडा खोकला हि कोरोनाची सामान्य लक्षणे आहेत; परंतु आजची परिस्थिती पाहता यात उलटी होणे, गंध न येणे, जिभेची चव जाणे, डोकेदुखी, अशक्तपणा, चक्कर येणे यांसारख्या लक्षणांची भर पडलेली दिसून येते. हि लक्षणे कोरोनाची लागण झाल्यापासून दोन ते चौदा दिवसाच्या कालावधीत समोर येतात. 

https://tejaswiswritingroom.blogspot.com/2021/05/treatment-for-mis-c-and-how-it-linked.html

 What is RT-PCR test ? (चाचणी कशी आणि कोणती)  

कोरोना विषाणूची लागण झाली आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी RT-PCR (Reverse Transcription Polymarase Chain Reaction) नावाची चाचणी करतात. यासाठी नाकातील आणि घशातील swab घेऊन चाचणी केली जाते. 


What is RT-PCR test price ?

संग्रह केंद्रावर RT-PCR चाचणी केल्यास ५०० रुपये घेतले जातात. त्याचप्रमाणे covid care केंद्रावर चाचणी केल्यास साधरणपणे ६०० रुपये घेतले जातात. 

https://tejaswiswritingroom.blogspot.com/2021/05/treatment-for-mis-c-and-how-it-linked.html



 Treatment for covid-19 : (उपचार)

कोरोना आजारावर उपचार करण्यासाठी औषधे आहेत. सद्यस्थितीवर मात करण्यासाठी देशात covaxin, Remdesivir, covishield, 2DG Drug यांसारखे औषध निर्मिती चालु आहे. या औषधांचा वापर करून लक्षणे कमी करता येतात.


 Precautions for covid-19 : (उपाय योजना / प्रतिबंध)

कोरोना हा सामान्य आजार नसून तो अतिशय गंभीर असा आजार होय. हाच विषाणू आज आपल्या समोर तोंड आ.. वासून समोर ठाकला आहे; त्यामुळे आपण यास हलक्यात न घेता कोरोनाची लागण होऊ नये यासाठी आपण पुढीलप्रमाणे काळजी घेतली पाहिजे – 

१) हात स्वच्छ पाण्याने धुतले पाहिजेत.

४० सेकंद हात धुवावे. हात साबण किंवा handwash चा वापर करून धुतले पाहिजेत. साबणाने व्हायरसच्या fatty protective layer ची विटंबना होते त्यामुळे विषाणू निष्क्रीय होतो. हात मातीने भरलेले असल्यास फक्त स्वच्छ पाण्याने धुतले जावे.

२) सार्वजनिक ठिकाणी नियमित मुखपट्टीचा (mask) वापर करावा.

घराबाहेर गेल्यानंतर मुखपट्टी नेहमी नाक, तोंड, दाढी झाकून लावलेली असावी. ती गळ्यात आभूषणाप्रमाणे (तोंडाच्या खाली) नसावी.  

३) इतर व्यक्तीपासून ३ फुट अंतर ठेवावे.

सार्वजनिक ठिकाणी वावरताना इतर व्यक्तीशी संवाद साधताना ३ फुट अंतराने लांब राहावे. यास social distance असे संबोधले जाते.    

४) पाणी उपलब्ध नसल्यास sanitizer चा वापर करावा.

आपण हजार असलेल्या ठिकाणी जर पाण्याचा अभाव असेल तर sanitizer स्वतःबरोबर ठेवावे व त्याचा वापर करावा.

५) गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. इतरांपासून विषाणू शरीरात प्रवेश करू शकतो.

हाताने नाक, तोंड, डोळे यांना स्पर्श करू नये. आपले हात नेहमी स्वच्छ नसतात. आपण बाहेर गेल्यानंतर कुठेही पृष्ठभागाला हात लावतो आणि त्या भपृष्ठभागावर हा विषाणू असु (संक्रमित व्यक्ती तिथे शिंकलेला, थूकलेला असू शकतो) शकतो आणि तो आपल्या हाताला लागतो; त्यामुळे विनाकारण स्पर्श करने अयोग्यच.

६) आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असावी.

मजबूत रोगप्रतिकारक शक्तीसाठी योग्य प्रमाणात व पौष्टिक आहार घ्यावा. आहारामध्ये कडधान्ये, डाळ, हिरवी पालेभाजी असावी.

७) दिवसभरामध्ये भरपूर पाणी प्यावे.

८) नियमित व्यायाम व योगासने करावीत.

९) बाहेरून आणलेले पदार्थ मिठाच्या पाण्यात भिजत घालून तासाभरानंतर स्वच्छ धुवूनच वापरावेत.

१०) सार्वानिक शौचालये वापरू नयेत.

११) ई-पेमेंटचाच (शक्य होईल तेवढा) स्वीकारावा.

१२) काम संपल्यानंतर लवकरात लवकर घरी जावे व अंघोळ करावी.

१३) कोणाचीही भेट घेऊ नका.

१४) शेजारी व अगदी कुटुंबाची देखील भेट घेऊ नका.

१५) कागदपत्रे हाताळताना किंवा पैसे मोजताना थुंकीचा वापर टाळावा.

१६) स्वतःचाच फोन वापरा. इतराचा फोन घेऊ नये. 

१७) शेक hand टाळावा. पारंपारिक पद्धतीने नमस्कार करावा.

१८) शासनाकडून देण्यात येणाऱ्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

१९) रस्त्यावर थुंकू नये.

२०) नियम पाळा संकट टाळा. जास्तीत जास्त काळजी घ्या.


https://tejaswiswritingroom.blogspot.com/2021/05/treatment-for-mis-c-and-how-it-linked.html

Effects of covid-19  vaccine  :

कोरोनाची लस घेतल्यानंतर या लसीचा परिणाम जास्तीत जास्त सहा महिने राहतो. त्यामुळे लस घेणाऱ्या व्यक्तीला कोरोना होणारच नाही असे नाही. लस घेतल्यानंतर फक्त लक्षणे कमी करण्यास मदत होते. लसीकरणानंतर ज्यांना मधुमेह, उच्च रक्दाबाचा त्रास, हृदयविकार असे गंभीर आजार आहेत, त्यांना धोका होऊ शकतो. लसघेतल्यानंतर रुग्णाच्या शरीरात इन्फेक्शन होऊन नवीन रोग जडू शकतो.

   जसे कि सद्यपरिस्थिती आपण बघू शकतो कि, अशा इन्फेक्शन मुळे रुग्णांना काळी, पांढरी, व पिवळी बुरशीची (mucormaycosis) लागण झाली. आणि त्याचा सतत धोका उद्भवतो आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी लस घेताना काळजीपूर्वक डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यावी. 


कोरोना चीनमधून कसा संक्रमित झाला ?

२०१९ या वर्षी, सर्वप्रथम कोरोनाची लागण झालेले रुग्ण चीनमधील वूहान या शहरात आढळले. चीन मधील हुबेई प्रांतात जास्त व्यक्तींचा बळी गेल्याचे समोर आले. या वर्षात कोरोनाचे रुग्ण प्रथम चीन या देशात सापडल्याने वूहान या शहरास या विषाणूची उत्पत्ती स्थान समजले जाते आणि येथूनच या कोरोना महामारीने संक्रमाणास सुरुवात केली होती. कोरोनाचं मार्च २०२० पासून हळू हळू जगभरामध्ये संक्रमण होत गेलं. त्यानुसार मार्च २०२० मध्ये जगभरात १,३२,५५८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आलं. 


 corona update in India ? (भारतात कोरोनाची सद्यस्थिती काय)

२०१९ पासून कोरोनाचा उद्रेक पाहता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हा सार्वजनिक आंतरराष्ट्रीय आणीबाणी असल्याचे घोषित करून जागतिक महामारी जाहीर केली. 


 Covid cases ? (रुग्ण संख्या किती)

५ जून २०२१ पर्यंत भारतात कोरोनाचे १४,७७,७९९ सक्रीय case आढळून आले. त्याचप्रमाणे २४ तासात १,८९,२३२ जण कोरोनावर मात करून बरे झाले व २,६७७ जणांचा बळी गेला. त्याचप्रमाणे दैनिक रुग्णसंख्या लागोपाठ दहा दिवसांपासून दोन लाखांपेक्षा कमी झालेली दिसून आली. 


Vaccination in India :  (लसीकरण ) 

आत्तापर्यंत भारतात २३ कोटी १३ लाख पेक्षा जास्त जणांच लसीकरण करण्यात आलं आहे. ५ जून २०२१ रोजी ३१ लाख २० हजार पेक्षा जास्त जाणांच लसीकरण करण्यात आलं. त्यामध्ये २८ लाख ७० हजार जणांना पहिला डोस दिला गेला. तसेच २ लाख ४९ हजार जणांना दुसरा डोस दिला गेला.८ जून २०२१ रोजी शासनाने दिलेल्या परवानगीनुसार १० ते १८ वयोगटातील लसीकरण यशस्वी ठरले असून आता आणखी लस पुरवठा करण्याची तयारी सुरु आहे. 

https://tejaswiswritingroom.blogspot.com/2021/05/treatment-for-mis-c-and-how-it-linked.html

Variants वरून कोरोनाचं बारसं :  

कोरोनाचे अनेक प्रकार (Variants) पहावयास मिळत आहेत. त्यामुळे हे लक्षात रहायला सोप्प जावं यासाठी कोरोनाच आता बारसं केल गेलं आहे. अर्थात या प्रकारांना वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. ती पुढीलप्रमाणे –

+ UK २०२० मध्ये आढळला तो – अल्फा

+ दक्षिण आफ्रिकेत मे २०२० मध्ये आढळला तो – बीटा

+ ब्राझील नोव्हेंबर २०२० मध्ये आढळला तो – गामा  

+ भारतात ऑक्टोंबर २०२० मध्ये आढळला तो – डेल्टा

+ अमेरिकेत मार्च २०२० मध्ये आढळला तो - एप्सिलोन

+  भारतात ऑक्टोंबर २०२० मध्ये आढळला तो – काप्पा 


संशोधकांनी यावर आणखी संशोधण केलेले दिसून येते. त्यातून कोरोना हा विषाणू सार्स कुटुंबातील सदस्य म्हणून समोर आला. त्यानुसार यापूर्वी हा विषाणू २००३ साली संक्रमित झाला होता; परंतु तेव्हा हा एवढा घातक नव्हता. आत्ताच्या स्थितीतील कोरोनाचे जे स्वरूप आहे ते मानव जातीला अतिशय घातक आहे.

https://tejaswiswritingroom.blogspot.com/2021/05/treatment-for-mis-c-and-how-it-linked.html
  

  मानव जातीवर एवढया गंभीर स्वरूपाने परिणाम करणारा व प्राणघातक अशी हि महामारी पहिल्यांदाच पहावयास मिळते आहे. कोरोना महामारीने, मानवाने कधी स्वप्नातही विचार न केलेल्या परिस्थितीत टाकून; एका वेगळ्याच मार्गावर आणून सोडलं आहे. तरीही आपण सर्वांनी सकरात्मक राहून या लढाईत यशस्वी व्हायचे आहे. 


बुधवार, २ जून, २०२१

DRDO's 2DG Drug : अशी करते कोरोनाची फसवणूक...!

कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणातून इन्फेक्शन होऊन नवीन आजारांची उत्पत्ती होत असताना यावर अनेक औषधांचा, लसींचा (Remdesivir, Covaccine, Covishield) चा वापर करून बघितला; परंतु कोरोना नावाचं संकट काही गेलं नाही. पहिल्या टप्प्यात जास्त प्रमाणात परिणाम होताना दिसून आला नाही. दुसऱ्या टप्प्यात मात्र परिस्थिती अतिशय गंभीर होताना दिसून आली, कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी लक्षणे पाहण्यास मिळाली. त्याचबरोबर कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या कमी झाली. दुसऱ्या टप्प्यात सुरुवातीला जास्त गंभीर परिस्थिती नव्हती; परंतु दुसऱ्या टप्प्याच्या मध्यात आल्यानंतर स्थिती मात्र गंभीर होत गेली.लहान मुलांसाठी तज्ञांनी वर्तवलेला धोका आता सद्यस्थितीत पहावयास मिळत आहे. तो असा कि, कोरोनाबरोबर MIS-C (एम आय एस-सी ) या आजाराने आता लहान मुलांना स्वतःच्या आळ्यात अडकवल्याच दृश्य समोर येत आहे. 


चिंता कमी होणार ? 

मुलांसाठीच्या वाढणाऱ्या धोक्याबरोबरच जशी पालकांची चिंता वाढत आहे तशी आता हि चिंता काहीशी कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली येथील DRDO च्या प्रयोगशाळेमध्ये (Laboratory) 2DG Drug नावाचं कोरोनावरचं औषध विकसित करण्यात आलं आहे. काय आहे 2DG Drug ?



 

2DG Drug म्हणजे(What is 2DG Drug ?) :

या औषधावर DRDO (Defence Research & Development Organization) आणि डॉ. रेड्डीज Laboratory मध्ये एप्रिल महिन्यामध्ये काम सुरु केल गेलं. 2DG म्हणजे  Deoxy-D-Glucose होय. हे औषध Cancer च्या उपचारासाठी वापरलं जात; आता हे कोरोनावर हि मात करू शकते असे सांगण्यात येत आहे. DRDOच्या Institute of Nuclear Medicine & Allied Sciences Lab मध्ये तयार केलेलं हे औषध नक्की काम कसं  करत ?

 

2DG कसे कार्य करते? (How 2DG works on Covid ) :

Deoxy-D-Glucose म्हणजेच 2DG हे औषध थेट विषाणू (Virus) असलेल्या कोशिकांमध्ये (Cell) जमा होऊन विषाणूच्या उर्जेला नष्ट करते. तसेच औषधातील रेणू कोरोनाच्या SAARC Covid-2 या विषाणूला आळा घालतो. हे औषध glucose प्रमाणे दिसते; परंतु glucose नाही.

 

2DG चे फायदे (Benefits of 2DG) : 

 डीआरडीओच्या या औषधाचे फायदे पुढीलप्रमाणे दिसून येतात –

        ·       रुग्णाची प्राणवायु (oxygen) वरील निर्भरता कमी होते.

        ·       अंदाज पेक्षा रुग्ण तीन दिवस अगोदरच बरा होतो.

        ·       या औषधाचा कुठलाही प्रसारण प्रभाव (side effect) नाही.

        ·       रुग्णातील लक्षणे जलद कमी होतात.

 

 

औषधाची किंमत किती ? (Price of 2DG) :

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार किंमतीबाबत काही निश्चित नसून याची किंमत डॉ. रेड्डीज कंपनी ठरवणार आहे; परंतु हे औषध इतरांचा तुलनेत व्यक्तीला परवडणारे असेल. 2 डी जी औषध पाकीटाच्या (pouch) स्वरुपात आहे आणि हे पाकीट ५०० ते ६०० रुपयात उपलब्ध होईल.

 

2dg चे डोस कसे घ्यावेत ?

इतर Anti-dose प्रमाणे या औषधाचं इंजेक्शन नाही. पाकिटाच्या स्वरुपात असल्याने त्यात भुकटी (powder) असून, ती पाण्यात मिसळून प्यायची आहे. 2 डी जी चे असे डोस सात दिवस घ्यावे लागतील. महत्वाचं म्हणजे हा डोस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावा.


2 डी जी च्या बाबतीत एक विशेष (कदाचित गमतीदार) गोष्ट म्हणजे आपण कोरोनाला गंडवू (मजेत काढणे) शकतो. ते असं – “जेंव्हा विषाणू शरीरात प्रवेश करतो, तेव्हा त्याला जिवंत राहण्यासाठी उर्जा आणि पोषणाची गरज असते आणि हि गरज glucose च्या माध्यमातून भागवली जाते. तर 2 डी जी हे थेट कोशिकांमध्ये जाते व अगदी Glucose (शर्करा) सारखे दिसते. त्यामुळे कोरोना विषाणू जेव्हा शरीरात प्रवेश करेल आणि कोशिकांमधील हे glucose सारखं दिसणाऱ्या औषधाशी त्याचा संबंध येईल; तेव्हा तो आपोआपच नाहीसा होण्यास मदत होईल.”


2 डी जी साठी लागणारा कच्चा माल भारतात पुरेश्या प्रमाणात उपलब्ध असल्याने त्याचे उत्पादनही भारतामध्येच होईल. 2 डी जी ‘हे औषध कोरोनाविरोधातील लढाईत निर्णायक ठरेल, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. बरोबरच या औषधाच्या पाकिटांचे वितरण देखील लवकरच होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.’

डीआरडीओने विकसित केलेल्या या औषधाची हि पुनर्निर्मिती होय. हे औषध नवीन नव्हे. हे औषध कॅन्सरच्या उपचारासाठी वापरण्यात आलेले आहे. 2 डी जी या औषधाची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी जानेवारी महिन्यात सुरु झाली होती.     

 

या औषधाच्या चाचणीनंतर रुग्ण संख्या कमी होणार का ? हे औषध कोरोनाचा कायापालट करू शकेल का ? कोरोनाचा गेम ओवर होणार का ? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल. तसेच 2 डीजी च्या वापरानंतरची देशातील जी नवीन पहाट असेल ती नक्कीच पाहण्यायोग्य.


CDS General Bipin Rawat Death (तमिळनाडू)| भारताचे पहिलेच संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत अपघाती मृत्यू | Bipin Rawat Awards/medals | Bipin Rawat education

Bipin Rawat education | Salary | Defence work |  Bipin Rawat Awards/m edals |  Bipin Rawat RIP भारताचे पहिलेच संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन र...